अंक दुसरा


रटाळ झालेला विषय ‘स्थळ’. म्हणजे मी तर फार पकून गेलेलो आहे. आजकाल माझ्या डोक्यात कामापेक्षा जास्त विचार या स्थळांचे असतात. आणि आई वडिलांबद्दल तर काही बोलायला नको. ह्याच विषयावर चर्चा माझ्याशी करतात. मध्यंतरी ते गुरुजी आले होते ना! त्यांनी सांगितलेले स्थळ पाहायला परवा आई वडील इथे पुण्यात आले. मला पुण्यातील मला जितकी स्थळ माहिती झाली त्यामधील आता हे दुसरे स्थळ. कारण आई वडिलांच्या फिल्टर मधून पास होणे ९९% शक्यच नसते. त्यातून पुण्यातील एक स्थळ झाले होते. पण त्यांचे ‘हो नाय’. हे दुसरे स्थळाला बघायचा कार्यक्रम ठरला. पण ऐनवेळी त्यांचे बोलावणेच नाही. काय बोलणार आता?

मला ना, आजकाल जे घडते ते बघूनच डोके जाम फिरते. असो, त्यावर चर्चा करून काय फायदा नाही. मग खूप दिवसांपूर्वी एक स्थळ आले होते. त्यांचा वडिलांना फोन आला होता. आज ते स्थळ पाहण्याचा कार्यक्रम आहे. संध्याकाळी जायचे आहे. आणि हो नेहमीप्रमाणे माझा कधी डावा तर कधी उजवी पापणी फडफडणे चालू झाले आहे. आता एखादे स्थळ आले की, किंवा कोणते महत्वाचे काम असले की अस का होते देव जाणे. एकूणच आई वडील आल्याने मी खूप खुश आहे. आणि एकटेपणा सुद्धा पळून गेला आहे. आणि स्थळ पाहायला जायचे म्हणून आई वडील देखील आनंदी आहेत.

वडिलाच्या त्या ‘जे काही विचारायचे आहे, ते सर्वांसमोर विचार’ च्या इशार्याने काय कराव ते सुचत नाही आहे. पण ठीक आहे. भेटल्यावर समजेलच सर्व स्थळाबद्दल. आत्ताच बोलून काही उपयोग नाही. कारण त्या मुलीचा साधा फोटो सुद्धा मी पाहिलेला नाही. ती एम.सी.ए करते आहे. एवढीच काय ती माहिती मला मिळाली. असो, शिक्षण पूर्ण झाल्यावर लग्नाचा विचार का करत नाही हे लोक? म्हणजे निदान तिला करिअरचा तर या ‘लग्न’ विषयामुळे काही अडचण निर्माण होणार नाही. ते आधी म्हटले होते ना! एक स्थळ होते त्यावेळी देखील तिला शिकायची इच्छा. आणि घरच्यांच्या आग्रहामुळे ती लग्नाला तयार झालेली. त्यावेळी एका प्रकारे दोघेही ‘वाचलो’च. कारण दोघांची पत्रिकेत सगळ्याच गोष्टी सारख्या. म्हणून तिच्या वडिलांनी तिला, आणि माझ्या घरच्यांनी मला जास्त फोर्स केला नाही.

आज बोलायचे झाले तर काहीच सुचत नाही आहे. काय बोलायचे हाच एक खूप मोठा प्रश्न सकाळपासून निर्माण झाला आहे. मित्रासमोर मी नॉर्मल असल्याचे नाटक करतो आहे. आणि त्यांच्या गप्पात रस नसूनही, रस असल्याचे दाखवत आहे. सोडा, नंतरच बोलू..


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.