अजून एक परीक्षा


आज ती ऑफिसला आलेली आहे. इतकी मस्त ना! सगळच छान वाटत आहे. दोन दिवसाचं जेवण आज दुपारी केल. तेही निम्म्या वेळेत. आज ती खूपच छान दिसते आहे. आज सकाळी तीच्या आनंदात माझ्या पीएमला बिनधास्त पिंग करून ‘भेटायचे आहे’ म्हटले. त्याने दुपारी फोन कर असे बोलला. दुपारी फोन केल्यावर, अरे मी कशाबद्दल तेच सांगायचे राहून गेले. मी इथे कंत्राटदार म्हणून आहे ना. तर मला याच कंपनीच्या पे रोल येण्यासाठी काही करता येईल का ते पाहत होतो. आता तो माझा पीएम आणि माझे आधी घडले बिघडले झाले आहे.

मी काय करणार, माझ्यावर ‘ब्लेम गेम’ करायला निघालेले. चुका त्यांच्या आणि शिक्षा मला का? मी देखील मिटिंगमध्ये सगळ्यांना गुंडाळले. तेव्हापासून माझ्यावर त्याचा डोळा आहे. तेव्हापासून या ना त्या कारणाने नेहमी मला डॉमिनेट करायचा. आज फोन केल्यावर बोलला ‘तुला आपल्या कंपनीत यायचे असेल तर अजून एक परीक्षा द्यावी लागेल’. मी म्हटले ‘ठीक आहे’. तर बोलला ‘तुला फ्लेक्स येते ना! त्याची आणि कम्युनिकेशनची. पास झाला तर घेऊ नाहीतर कंपनी सोडावी लागेल’. असो, मीच त्याला एडोब फ्लेक्सवर काम करायची इच्छा सांगितलेली. कारण ती जावा डेव्हलपर आहे. आणि मी ‘वेब डिझायनर’. तीच्य आणि माझ्या प्रोफेशनमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे.

काहीतरी अस हव होत ज्याने हा फरक कमी व्हावा. म्हणून मी ते एडोब फ्लेक्स शिकले. आता त्यात मी नवीन आहे पूर्ण. म्हणजे मी त्यावर एकही प्रोजेक्ट बनवलेला नाही. आणि माझ इंग्लिश देखील म्हणव इतकं चांगल नाही. म्हणून त्याने अजून एक ‘गेम’ची तयारी केली आहे. असो, त्या चीटिंग नाही केली तर, निश्चित आणि निश्चितपणे घेतला जाईल. म्हणजे मला माझ्यावर तितका विश्वास आहे, की मी आरामात ही परीक्षा देवून टाकील. गेल्या तीन चार वर्षांपासून हेच तर करतो आहे. आणि यावेळी मला काहीतरी ध्येय आहे. असो, पण काय म्हणतात पीएमच्या आधीच्या अनुभवावरून त्याच्यावर ‘विश्वास’ नाही. फार मोठी गोष्ट नाही ही परीक्षा म्हणजे. त्यामुळे चिंता नसावी. पण तरीही मी दुसर्या कंपनींचे ऑफर लेटर घेऊनच परीक्षा देईल. तसे अजून एक ऑप्शन आहे. की मी दुसर्या कंपनीचे ऑफर लेटर घेऊन एचआरला ‘जय महाराष्ट्राची’ धमकी द्यायची. पण खर सांगायचे झाले तर मला तिच्यापासून एक सेकंदही दूर राहणे अवघड वाटते. आजचे घरी जायचे रद्द केले. उद्या जाईल.

या कंपनीवर माझे एकाही प्रेम वगैरे नाही. पण तिच्यावर आहे. काही हरकत नाही. आज मी मला आलेल्या पाच एक कंपन्यांच्या मेलला माझा रिझ्युम पाठवला. चिंता नसावी एखाद्याचे ऑफर लेटर मिळेपर्यंत ‘चिंता’. असो, काय सांगू आज ती काय दिसते आहे. ती नक्की मला हार्टअटॅक मारणार. आज तिने लाल रंगाचा टी-शर्ट घातलेला आहे. आणि मला एक मेल सुद्धा पाठवला. आणि मी केलेल्या मेलचा रिप्ल्याय सुद्धा केला. खूप छान वाटते आहे. तिचे हास्य यार, हृदयाचे ठोके चुकू लागतात. खूपच अवघड परिस्थिती होते. किती गोड आहे ती. खरोखरच अप्सरा आहे. ती सोडून कोणी नको. या असल्या फडतूस परीक्षांना कोण घाबरते आहे. आणि कसली भीती? अजून एक परीक्षा बस!!!


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.