अनुभव


खर तर ‘केलेल्या चुका’चे गोंडस समानार्थी शब्द कोणता असेल तर तो ‘अनुभव’. म्हणजे, जसे एखाद्या औषधाच्या गोळीला बाहेरील आवरण साखरेप्रमाणे गोड असते तसे. प्रत्येक जण आयुष्यात नित्यनियमाने ‘चुका’ ह्या करीतच असतो. त्यातूनच तो शिकतो. काय ‘नाही’ केल्यावर गोष्ट ‘अचूक’ बनते. हे कळल्यावर तो ‘अनुभवी’, ‘कुशल’ वगैरे बनतो.थोडक्यात ‘सिनिअर’ हा ‘सिनिअर’ असतो. प्रत्येक बाबतींमध्ये, ‘चुकांमध्ये’ सुद्धा. एखादा व्यक्ती ज्यावेळी ‘अनुभवाचा’ बढेजाव करतो. त्यावेळी न कळत तो तितक्याच प्रमाणात केलेल्या ‘चुकांची’ कबुली देत असतो. अनुभव प्रत्येकवेळी नव्याने भेटत असतो. परंतु, यातून आपण काय बोध घेतो, हे महत्वाचे. नाहीतर, फक्त चुकांची पोतडी वाढते. आणि त्याच्या ‘गर्वाचे’ ओझे सांभाळत कधी ‘अपमानाची’ ठेच लागते. होणाऱ्या वेदनेची दाह ‘मुकामार’प्रमाणे असतो. दिसतही नाही. आणि सहनही होत नाही.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.