अपघात


आज रात्री कंपनीच्या बसने घरी येताना डांगे चौकात एक लहान टेम्पो चौकातील मधोमध असलेल्या खड्यात गेलेला दिसला. आता तो काही एवढा मोठा नव्हता. पण टेम्पो पूर्ण वाकडा झालेला बघितला. तिथून पुढे बस चिंचवडच्या जुन्या नाक्यावर थांबली. तिथ सुद्धा लोकांचा घोळका. म्हटलं आता काय झाल तर एका कारवाल्याची आणि दुचाकीवाल्याची भांडणे. सध्याला चाफेकर चौकापासून ते जुना नाक्या पर्यंत पुलाचे काम चालू आहे. रोज त्यामुळे कोणी ना कोणी अस एकमेकांना धडकते आणि वाद सुरु होतात. मागील आठवड्यात देखील असंच. आरटीओ ऑफिस समोर एक खूप मोठा खड्डा आहे. त्यात खूप पाणीही साचालेल आहे. काही दिवसांपूर्वी एक रिक्षा त्यात पडली. बर खड्डा बावीस फुट खोल आणि त्यात पाणी. देवाची कृपा म्हणायची एका तरुणाने उडी मारून प्रवाश्यांना वाचवलं.

या रविवारी ब्रेमेन चौकात असंच एक अपघात झाला. एका लष्करी साहेबाच्या उद्योगाचे परिणाम. साहेब बायको सोबत ‘धूम’ वेगाने चालले. आणि त्या ब्रेमेन चोकात गाडीचा ताबा सुटला. आणि गाडी दुभाजाकात असलेल्या विजेच्या खांबाला धडकून उडून डाव्या बाजूच्या रस्त्यावर उडून येऊन घासत गेली. गाडीचे दोन तुकडे झाले. आणि त्यात दोघे तरुण जखमी झाले. पण लष्करी अधिकारी साहेब आणि त्यांची बायको ठीक आहेत. मागील महिन्यात आमच्या बीआरटीने असाच एका लघुपट निर्मात्याला उडवलं. बिचारा त्यात ठार झाला. या आधी असंच एका पद्मावती चौकात बीआरटीने रिक्षाला मागून धक्का दिला. त्यात तो रिक्षाचालक आणि एक पादचारी जखमी झाले. या देहुरोडच्या पुलावर देखील मागच्या महिन्यात एका तरुणाला कंटेनरने उडवलं. त्या तरुणाचा एक महिन्यापूर्वी ‘मुलगी’ पाहण्याचा कार्यक्रम झाला होता. आता त्या कंटेनरवाल्याला पकडल आहे. हे अस काही बघितलं ना खूप डोक दुखायला लागत. नाही तरी रस्यावर गेल्यावर ‘रोड र्ह्यश’ किंवा धूम पाहतो असंच वाटत. आमच्या पुण्यात सगळेच दुचाकीवाले जॉन असल्याप्रमाणे त्यांच्या दुचाक्या दामटतात. सगळ्यांना नुसतीच घाई. आणि मागे मुलगी बसली की काय विचारू नका. मग तर बारा हत्तीच बळ संचारत ह्या सगळ्या जॉन मध्ये.

मलाही दुचाकी घायचा विचार सहा महिन्यांपूर्वी आला होता. आणि मी दिवसभर त्यावर विचार करून कोणती घ्यायची हे ठरवलं देखील होत. पण त्याच दिवशी संध्याकाळी तीच्या बहिणीचा अपघात बघून तो विचार डोक्यातून गेला. दोन महिन्यापूर्वी असाच माझ्या काका राहतो त्या गल्लीतला एक तरुणाचा अपघातात मृत्यू झाला. अस रोजच कुठे ना कुठे घडतं आहे. काय करणार आमचे रस्ते आणि त्यात आमचे हे जॉन. पण एसटी महामंडळाचे या उलट. ते ‘मेरी सपनो की राणी कब..’ त्या वेगाने गाडी चालवतात. आणि कधी कधी त्यापेक्षा कमी वेगाने. घरी आल्यावर यावर बोलू का नको अस झाल होत. पण बोललो. आता मन मोकळ झालं…


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.