अप्सरा आली


आहाहाहा! काय दिसते ती. खरंच ‘अप्सरा’ आहे. काय काया आहे. या कंपनीत आल्यावर तिला पाहिलं आणि कंपनीत आहे की इंद्रपुरीत काय कळत नव्हत. रोजचं तिचे ते शृंगाररूप. वा! तीच वर्णन करतांना शब्द फारच बापडे वाटतात. खूप दिवसांपासूनची बोलायची इच्छा होती. दर शुक्रवारी तर ती जेव्हा येते, त्यावेळी माझे हृदयाचे ठोके सेकंदाला हजार किमीच्या वेगाने पडतात. ‘हिरकणीच’, ‘नटरंग’ मधील सोनाली जशी आहे ना तशी ही आमच्या कंपनीतील ही आहे. आज हिम्मत केलीच. वा! कोमल, रत्नप्रभा. स्वच्छ, निर्मल काया. तिचा आज चुकून मला धक्का बसला. काय सांगू! अंगात चारशे की चार हजार किलो व्होल्टेजचा धक्का बसल्या प्रमाणे. ती किती कोमल आहे. अगदी रेशमी वस्त्राप्रमाणे.

एवढी देखणी आहे की काय सांगू. नेत्रकटाक्ष तर असा की त्यातच बुडून जावसं वाटत. त्यात तिची हनुवटी आणि गाल. आणि ओठांवर… आता त्याबद्दल मी मला काय वाटत त्याबद्दल काहीच सांगणार नाही. इतकी किमोह आहे. काल तिने तो ‘सोनेरी’ रंगाचा ड्रेस. वा! ड्रेसमध्ये एवढी छान दिसते तर साडीत तिची ‘कटी’. आहाहाहा! कल्पनाही अंगावर शहारे आणते. धक्का लागल्यावर दोन एक मिनिटं हरवूनच गेलो होतो. आणि जेव्हा माझ्या सोबत काल दुपारी माझा डबा संपवत होती. काय सांगू तो क्षण. माझ्या एवढ्या जवळ होती. किती दिवसांपासूनची तिला जवळून पाहायची इच्छा होती. काल ती पूर्ण झाली. मनात अगदी ‘झुबी-डुबी’ चालू होत. खर तर हिचाच किती दिवसांपासून शोध घेत होतो. तिला पहिल्यापासून झोप नावाचा प्रकार कुठल्या कुठे गायब झाला आहे. आणि झोप लागली तरी स्वप्नात तिच्याच सोबत असतो.

मनातलं पहिल्याच भेटीत म्हणावं यासाठी मन आंदोलने करीत होत. जेवण झाल्यावर आम्ही कंपनीच्या बाजूला असलेल्या कंपनीच्या छोट्याशा बागेत बसलो होतो. असो, ती देखील खूप हसून बोलत होती. किती गोड हसते. तीचे हास्य काय सांगू. मोत्यासारखे शुभ्र दात. आणि दुधाचा वर्ण. आणि तिचे बोल म्हणजे कानात मध पडतो की काय असाचं भास होत होता. बोलतांना तिचे डोळे अन ओठांची हालचाल मदहोश करत होती. कसाबसा स्वतःला सावरलं. सोबत पुन्हा कंपनीत जातांना तिचा होणारा स्पर्श अंगात अनेक सुखद वेदना निर्माण करणारा होता. कालचा दिवस याआधीही कधी आला नव्हता. आणि येणारही नाही. याआधी कोणीही मला इतकं छान, सुंदर आणि माझ्याबरोबर प्रेमळपणे बोललं नव्हत. तीची निरागसता आणि सौंदर्य म्हणजे ‘योवन बिजली’.

मी आज का गावी चाललो आहे? तिने मला भेटायचं का? अस विचारलं होत. अगदी मनातलं बोलत होती. मी देवाचा मनापासून आभार मानतो की त्यानी आत्तापर्यंत मला आवडलेल्या मुलींना मी आवडून दिल नाही ते. लगेचंच होकार देणार होतो. पण नंतर आई वडिलांना येतो म्हणालो होतो अस लक्षात आल. मग काय नकार दिला. आत्तापर्यंतची ही मला भेटलेली ‘अप्सरा’ आहे. याआधीही भेटलेल्या काही कमी नव्हत्या. आपण हीचे चांदणी रूप, आणि खरंच अप्सरा म्हणावी अशी आहे. आणि हो हीच पहिली मुलगी जी स्वतः माझ्यासोबत म्हणजे फक्त माझ्यासोबतच लंच केला आहे. काल ‘सुट्टीच्या शुभेच्छा’ च्या नावाखाली तिचा हातात हात घेतला. काय सांगू पूर्ण शरीरभर सुखाचा स्पर्श होत होता. अर्धा मिनिटे तसाच उभा होतो. आणि ती देखील काही म्हणाली नाही. त्या छबिदारला मिळवण्यासाठी बहुतेक मी मागील जन्मी काही तरी मोठे पुण्य केले असावे. अजूनही हात हातात असल्याचा भास होतो आहे. आणि या विचाराने अंगावर शहारा देखील येतो आहे. असो, मला काय सांगायचे आहे ते आत्ताच बोलून टाकू का मी? राहावतच नाही. मी ना अशा अप्सरेचा रोजचं विचार करत होतो. उशिरा का असेना मला मिळाली याचा आनंद आहे. आणि त्यापेक्षाही मोठ्ठा आनंद आत्ता होत आहे.. कारण ‘अप्सरा आली’ वगैरे काही आली नाही आहे, मी तुम्हाला उशिरा फुल केल आहे….. 😀 काल विसरून गेलो होतो म्हणून आज करून टाकल.. 🙂


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.