आकर्षण


सकाळी आवरून कंपनीच्या कंपनीच्या बसमध्ये बसलो. बस पुढच्या स्टॉपवर एक मुलगा चढला. माझ्या बाजूची ‘ताई’ त्याकडे एकटक बघत होती. आणि तो माझ्या बाजूच्या तीन सीटच्या बाकावर बसला. तिने तो जवळ आल्यावर खिडकीतून बाहेर बघायला सुरवात केली. आणि त्याने सीटवर बसल्यावर तिला एक नजर पहिले. आता ती माझ्या शेजारी बसलेली. तरी माझी तिला पाहण्याची इच्छा झाली नाही. आणि तिलाही मी. आणि त्यालाही तिच्याकडे पाहण्याची इच्छा झाली. अस कंपनी येईस्तोवर चाललेलं. अस सारख नाही. पण दर पाच दहा मिनिटांनी चालूच.

असच का घडल याचा विचार करीत होतो. आता त्यातील तो मुलगा रोजचा आहे. माझ्या ओळखीचा देखील. पण ती मुलगी नवीन होती. तरी देखील अस घडल. याला प्रेम म्हणण योग्य होईल अस मला तरी वाटत नाही. कदाचित हे ‘आकर्षण’ आहे. आणि तसे नेहमीप्रमाणे ‘मिस्ट्री’ अधून मधून माझ्याकडे पाहून ‘टाईमपास’ करीत होती. याचा अर्थ काहीच नाही आहे. ती पाहते याचा अर्थ मी देखील पाहतो अस नाही. पण कदाचित हे देखील आकर्षण आहे. आपण कुठलीही गोष्ट पाहतो, त्यात इंट्रेस दाखवतो. कारण एकच ‘आकर्षण’. सगळीकडे आकर्षणामुळे आपण जवळपास सर्वच गोष्टी करतो.

अगदी दुकानातून एखादी वस्तू विकत घेतो. त्यावेळी देखील आपण पाहून मनाला जी भावेल ती आधी निवडतो. कोणाला मित्र मैत्रीण बनवायचे हे देखील. आणि कोणाबद्दल पहिले मत बनवतांना आपण आकर्षित झालो आहोत यावरच ठरवतो. जरा जास्तच जड होत आहे, अस वाटत आहे. थोडक्यात मला अस म्हणायचे आहे की, रामायण का घडल? तर सीतेला रावणाने अपहरण केले म्हणूनच ना! आता सीतेचे का अपहरण झाले? रामाचे का झाले नाही? कारण हेच ‘आकर्षण’. आता मला हे मान्य आहे. राममंदिर किंवा काश्मीर ह्यावर होणारे वाद काही ‘आकर्षण’ नाही. पण अनेक अशा गोष्टी आहे की ज्या आकर्षणामुळे घडतात. आकर्षण ही इच्छेची ‘मम्मी’ आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.