आज मी बोललो


खूप मस्त वाटत आहे. काय सांगू, खरच नाचावस वाटत आहे. आज मी तिच्याशी बोललो. आणि सकाळी ‘हाय’ सुद्धा म्हटलं. सकाळी खर तर डोक खूप दुखत होत. पण तिला पाहिलं आणि कमी झाल दुखायचं. काल असंच, रात्री उपास झाला. सर्दी, खोकला त्यामुळे आणखीन डोकेदुखी वाढली. आज सकाळी कंपनीत यायला मग उशीर झाला. आलो तर शेंड्या तिच्या डेस्कवर पहिला. मग काल प्रमाणे. पण हिम्मत केली. आणि बोललो. यार आता माझ्या डेस्कच्या बाजूने गेली. एक दिवशी नक्की ही हार्टअटॅकने मारणार. ती इतकी छान आहे ना! आणि आज किती छान दिसत आहे. बस पाहताच रहावस वाटत.

त्यात आज ती सुद्धा एकदा मला ‘हाय’ म्हणाली. म्हणजे दोनदा झाल. तिचे ते हसणे यार. कलिजा खलास करून टाकते. आता दुपारी गेलो होतो तिच्या डेस्कवर मी. पण आवाजच गेला. म्हणजे मला तिला ‘मला एक हेल्प हवी आहे’ अस म्हणायचे होते. पण शब्दच तोंडातून फुटेना. तिने मला पाहून ‘काय?’ असे म्हटले. यार, ती समोर असली की, असल्या चुका होतात. मग पुन्हा ‘हेल्प हवी होती’. ती ‘अच्छा’. तिला म्हटलो ‘इमेज फाईल मधील टेक्स्ट रीड करून टेक्स्ट फाईल मध्ये राईट करायचे. अस करता येईल का?’. मग तिने विचारले ‘म्हणजे?’. मग तिला पुन्हा समजावून सांगितले. तिला म्हटलो ‘मला सॉफ्टवेअर नको. कोड हवा. म्हणजे कोणत्याही लॅंग्वेज मध्ये चालेल. पण ओउटपुट इमेज मधील टेक्स्ट रीड करता आले पाहिजे’.

आता माझ्या बहिणाबाईच्या ह्यांना, म्हणजे माझे दाजींनी मला अस होवू शकते का म्हणून रक्षाबंधनाला विचारले होते. मी त्यावेळी त्यांना होवू शकते. पण मी कधी केलेले नाही. शोधावे लागेल अस सांगितले. त्यावेळी ते मला शोधून दोन तीन दिवसांनी सांग म्हटले होते. आता पंधरा दिवस झाले. आणि त्यांचे चार फोन आणि पाच एक एसएमएस येऊन गेले. काय झाल म्हणून. आणि आता मी खूप शोधले पण नाही सापडत. म्हणजे जे काही सापडले ते परिपूर्ण नाही. त्यामुळे गेले दोन तीन दिवस असेच गेले आहेत. म्हणून तिला बोललो. असो, हा प्रश्न सुटण्यापेक्षा आज तिच्याशी बोललो, हेच माझ्यासाठी खूप  मोठे आहे. ती देखील थोडी गोंधळून गेली होती. प्रश्न सुटेल, याबद्दल चिंता नसावी. पण आजचा दिवस देखील खूप छान आहे. आज मी तिच्याशी थोडे का होईना, आणि विषय वेगळा का असेना. पण रोज थोडे थोडे. असो, सगळेच घाई कर अस म्हणत आहेत. पण माझी हिम्मतच होत नाही. आणि मला तिला कोणताच त्रास द्यायचा नाही. असो, बाकी सर्दी आता कमी झाली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.