आणि शेवटी ‘बाय’


काय छान सुरवात झाली होती. पण पुढे ना! खूप बेकार दिवस गेला आज. म्हणजे तो ‘शेंड्या’. तीच्या बाजूला बसतो. ती किती वेळ त्याच्याशी बोलली. ती डेस्कवरून गेल्यावर ना! अगदी नाचावसं वाटत होते. आणि मी खूप खुश सुद्धा. पण ती तीच्या डेस्कवर जाऊन बसली. मग झालाच तो सुरु. आता हिने सुरवात केल्यावर तो कसला सोडतो आहे. आता मला माहिती आहे, शेंड्या कंपनीच्या कामासाठी दोन एक वेळा जर्मनी वगैरे फिरून आला आहे. आणि मी जामनेर सुद्धा नाही. पण त्या शेंड्याला दुसरी कोण नाही भेटत का? खूप राग आला होता, त्याचा नाही ‘अप्सराचा’. ती खूप छान आहे. म्हणजे कोणीही फिदा होईल तिच्यावर. पण हा जर्मनी रिटर्न, नाकावरची माशी सुद्धा उठली तर शपथ. मला ना, गंगा यमुनेचा महापूर येण्याची शक्यता बळावली होती. अगदी दुपारपर्यंत चालू गप्पा. अस वाटायला लागलं होत की, तीला काहीच नाही वाटत माझ्याबद्दल. जे काही वाटत ते त्या शेंद्याबद्दल. खरंच नाही सहन झालं. मग मी माझ्या डेस्कवरून उठून गेलो. मला माहिती आहे, माझा तिच्यावर काहीच हक्क नाही. आणि दाखवायला सुद्धा नको. तीच्या आयुष्यात मी लुडबुड करणारा कोण?

असो, जेवणाची वेळ होईपर्यंत एका मित्राची मदत करीत बसलो. देवाची कृपा म्हणायची त्यालाही बरेच काम अडलेले. आज मित्रांना आग्रह करून देखील त्याच जुन्या कॅन्टीनमध्ये. तिची जेवतांना खूप आठवण येत होती. आणि रागही. जेवण झाल्यावर, तीच्या डेस्क जवळून जाव. आणि जातांना तिला ‘जेवण झालं का?’ अस विचाराव. म्हणून धावपळ करीत वरती आलो तर, पुन्हा तो शेंड्या तीच्या सोबत गप्पा ठोकताना. आणि त्याचा सोबत तो ‘नारळ’. आता ह्या नारळाला, कसं कळत नाही तिला. त्या नारळाच्या तोंडावरून दिसते. तो कशासाठी तिच्याशी बोलतो आहे ते. म्हणजे मुद्दामहून त्या शेंडीच्या डेस्कवर येतो. आणि हिला पहात बसतो. असो, मग काय अजूनच चेहरा उतरला. काहीच सुचेना. मग नाही नाही ते विचार यायला लागले. काय करू यार? माझे डोके फिरले होते. मित्राला फोन केला एका. आणि खूप वेळ गप्पा मारल्या. मुळात गप्पा मारायची देखील इच्छा नव्हती. पण राग शांत करायचा होता ना! तरीही राग जाईना.

बोलता बोलता मागे वळलो तर ती चाललेली. पाहून राग पळून गेला. तरीही डोक जाम दुखायला लागलेलं. तीच्या डेस्कच्या बाजूने जातांना, तिला पाहण्याची खूप इच्छा होत होती. पण नेहमीप्रमाणे. सोडा ते सगळ. संध्याकाळी निघतांना बाय करू म्हटलं. आणि ती होती देखील डेस्कवर. पण माझे कुंभकर्ण मित्र. फार घुळू घुळू. मित्राला गाडीची किल्ली दे बोललो तर. कॅन्टीनमध्ये देतो बोलला. पुन्हा तीच्या डेस्कवर पाहतो तर, ती दिसली नाही. खूप बोर झालं! सकाळी ती स्वतःहून आलेली माझ्याशी बोलायला. आणि मी, मी ना! खरंच महान आहे. ती समोर आली की काय बोलावं तेच कळत नाही मला. म्हणजे खूप काही बोलायचं अस ठरवतो. रोज रात्री तीच्या फोटोशी खूप गप्पा मारतो मी. पण ती प्रत्यक्षात आली की सगळ फूस. आणि खर सांगू का, माझ्याकडे आहे तीचा फोन नंबर . फोन नंबरच काय तीचा घराचा पत्ता देखील आहे. पण चुकून कधी तिला कळल की आहे माझ्याकडे तर ती काय विचार करेल याची भीती वाटते. आणि चुकूनही तिला माझा ब्लॉग कळला तर झालं!

नगरला ‘फ्रेंडशिप’ मागण्याची एक पद्धत आहे. मी कधीच कोणाला काही मागितले नाही. पण अनेकवेळा पाहिलेलं. कॉलेजात एखादया मुलीला एखादा मुलगा त्रास देत असेल तर चप्पलचा प्रसाद. आणि बसमध्ये ‘श्रीमुखात’. बिनधास्तपणे मुली ठोकतात. मी यापैकी कधीच काही खाल्लेल नाही. पण तिला माझा ब्लॉग कळला तर नक्कीच यापैकी काही तरी मिळेल याची शंका वाटते. कारण ती इतकी छान. आणि मी इतका बंडल. म्हणजे माझ्याकडे काहीच नाही अस की तिला मी आवडेल. असो, सोडा. म्हणजे तीच्या मनात माझा विचार देखील आला तर मी माझे भाग्य समजेन. कॅन्टीनमध्ये जातांना ती दिसली. मी कॅन्टीनमध्ये चाललेलो. आणि ती कॅन्टीनमधून बाहेर येत होती. आणि सोबत एक वानर होतंच. आणि तिनेही लक्ष दिले नाही. मित्राकडून किल्ली घेऊन लगेच निघालो. पण पुन्हा बाय करावं अस डोक्यात आल. म्हणून पुन्हा डेस्कवर गेलो. पण ती तिथे नव्हती. मग मात्र जाम टेन्शन आल. काहीच सुचत नव्हते. तसाच गेटच्या जवळ आलो तर ती. आणि हो, तिनेच हात हलवून ‘बाय’ केल. त्यावेळी देखील सकाळप्रमाणे! छातीत कळ आली होती. स्वप्नंच! तसाच कसाबसा बाय करून घरी आलो. आज नाही कोणाला उडवले. आणि दुपारी जेवतांना पिठले खाल्ले. पण बोलता बोलता तीचा मोबाइल नंबर नक्की घेईल. फक्त माझा मोबाइल तीच्या हातात नाही गेला तर! नाहीतर ‘रामायण’.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.