आता तरी देवा आम्हाला..


हे क्रिकेटच्या देवा! हे मनोहरा, हे गोलंदाज निर्दालक, हे संकटमोचक! आम्हा तुझ्या भक्तांना तू खेळपट्टीवर उभा राहून, तुझ्या फळी नामक वज्राची तीक्ष्ण धारेने गोलंदाजांची व समोरील उभा ठाकलेल्या संघाची दाणादाण उडव. तुझ्या लयबद्ध आणि एखादया गायकाच्या आवाजाचा खोलावा जाणावा आणि त्याने श्रोत्यांचे मन तृप्त व्हावेत. त्याप्रमाणे तुझ्या फलंदाजीची मनमोहक फटकेबाजीने आम्हाला तृप्त कर.

देवा आम्ही त्या आनंदमयी क्षण साठवून ठेवण्यासाठी अनेक दिवसांपासून आसुसलेले आहोत. तुझी ती अचूकता, ती न विसरता येणारी खेळी पाहण्यासाठी समस्त भक्तगण तहान भूक विसरून खोळंबलेली आहे. घरी असो, कंपनीत असो किंवा अगदी प्रवासात. शाळकरी मुल असो, तरुण असो किंवा अगदी आवाजाचा, कानाने रामराम दिलेले वयोवृद्ध. देवा तू मैदानावर फलंदाजी करण्यासाठी आला की, सर्वांचा हृदयाचा ठोका जोरातच होतो. जशी आमची परिस्थिती, तशीच तुझ्या समोर गोलंदाजी करणारे गोलंदाजांची. तूच आमच्या संघाचा तारणहार! तूच एक संघाचा आधारस्थान. थोडक्यात तू आमच्या संघाचा आधारवड.

पण, गेल्या अनेक दिवसापासून एक अनामिक भीती वाटते आहे. तूच ‘एकमेवाद्वितीय’ भीतीचे सावट दूर करणारा. हे परमेश्वरा आता तरी क्रिकेटच्या मैदानावर उतरून तुझ्या तळपत्या चेंडूफळीची ताकद दाखवून दे. हे संकटमोचन! आपल्या संघावर येणारे संकटावर मात करण्याची सिद्धता केवळ तुझ्यात आहे. त्यामुळे, आता तरी देवा आम्हाला पावशील का? सुख ज्याला म्हणतात ते दावशील का?

,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.