आता म्हणाले खोट बोला


आज दुपारी परत त्या लोनवाल्याचा फोन. म्हणाला कि पैसे मी माझ्या हेडकडे दिले आहेत. तुम्ही आज येवून घेवून जा. मला एकूण आश्चर्यच झाले. काल परवा पर्यंत, ह्या महिन्यात नाही पुढच्या महिन्यात देतो म्हणणारा आज अगदी पैसे घेवून जा म्हणतोय. मी त्याला ठीक आहे अस म्हणालो. नंतर संध्याकाळी त्याच्या हेडला फोन केला तर तो मला म्हणाला कि तुमचे पैसे माझ्याकडे त्याने दिलेले आहेत. तुम्ही कधीही येवून घेवून जावू शकता. वाटल तर मी तुमच्या घरी येवून पैसे देतो. पण तुम्ही मला एक वायदा करा कि कस्टमर केअर कडून जर फोन आला तर त्यांना सांगा कि ‘मला त्याचवेळी पैसे त्या लोनवाल्याने घरी येवून दिले होते. पण त्यावेळी मी घरी नसल्याने त्याने ते पैसे माझ्या घरच्यांकडे दिले. मला हे माहित नव्हते. घरी फोन करून विचारल्यावर मला समजले’. नाही तर त्याची नोकरी जाईल. मी तसा मुख्यालयात मेल केला आहे. कि तुम्हाला माहित नसल्याने अस घडल. हे सगळ ऐकून काय बोलाव हेच कळल नाही.

म्हणजे चूक त्याची. आणि त्याची माफी मी मागायची. इतके दिवस मी त्याला फोन करायचो आणि हा कधी कट करायचा तर कधी बिझी असल्याचे दाखवायचा. कधी कधी तर त्याचा फोन बंद करायचा. आता ज्यावेळी त्याची लागली आहे तेव्हा आता मला खोट बोल अस म्हणतोय. जाऊ द्या मला माझ्या मुळे कोणाच नुकसान व्हाव अस वाटत नाही. आज काही ते पैसे घ्यायला वेळ मिळाला नाही. उद्या येतो म्हणून त्याच्या हेड ला सांगितले आहे. आणि हो माझा सिनिअरला आज चांगलाच माझ्या बॉस नी झापलं. तो काही त्याच काम पूर्ण करत नाही. आणि सदा सर्वदा माझ्या मागे, सारखा माझ्या कामात लुडबुड. मग त्याच काम अपूर्णच राहते. मग त्याला आज बॉस नी कामाबद्दल झापलं. मग होता शांत. पण ते म्हणतात ना जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. तस आहे त्याच, पुन्हा त्याला म्हटलं त्या फोन्ट बद्दल. पण लेकाचा फार चालू आहे. दिला नाही. पण मी पण काही कमी नाही. आज कंपनीत मराठीशी मराठीतच बोलून त्याला चांगालाच सतावलं. त्याला काही मराठी शिकण्याची आवड ना इच्छा. पण राहायचे इथे. पण बोलायचे नाही. मालक मराठी, शहर मराठी, राज्य मराठी पण ह्याला काही त्याचे सोयरे सुतक नाही. मराठी येत नाही अस म्हणणार नाही. बोलणार तुम्ही हिंदी बोला. आणि तो दुसरा लोन वाला. तो देखील तसाच. दोघेही इथ येवून पाच पेक्षा जास्त वर्ष झाली. आता जन्माला येवून मुल पाच वर्षात न व्याकरण शिकता खडान खडा कोणतीही भाषा आत्मसाथ करते. आणि हे. काय बोलाव? जावू द्या. पण ह्यांची एक गोष्ट मात्र मला चांगलीच कळली आहे. कि हे कधीच चूक मान्य करत नाहीत. आणि जर झालीच तर माफी देखील मागत नाहीत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.