आनंदी आनंद घडे


आज मला मागे आधी बोललो होतो ना, एका कंपनीत मी मुलाखत दिली होती. त्यांची ऑफर आली. मी जेवढी अपेक्षा केली होती त्याच्या दुप्पट मला त्यांनी ऑफर केली आहे. थोडा इथ जॉइनिंग डेटचा गोंधळ चालू आहे. पण उद्यापर्यंत सुटून जाईल तो प्रश्न. आज सकाळी वातावरण खूपच छान होते. म्हणजे काल रात्री पासूनच पुण्यात भुरभूर चालू होती. आत्ताही पाऊस चालू आहे. आज माझे वडील बरोबर होते म्हणून. नाही तर मी नेहमी अशा पावसात भिजत असतो. बाकी खूप दिवसांनंतर आनंद झाला आहे. काल अबूच्या थोबाडात मारलेली बघितल्यापासून माझा मुडच बदलला आहे. असो, काल अनेकांचे त्यावर लेख वाचले. आणि अनेकांची प्रतिक्रिया वाचल्या. संमिश्र आहेत मत. आज सकाळच वातावरण असलं मस्त होत ना. कंपनीतील माझा मित्र या वातावरणामुळे उशिरा उठला. काल दिवसभर उन नव्हते. आणि आज दुपार पासून पाऊस. एकूणच खूप छान वातावरण होते. आज ऑफर बघून म्हटलं  बॉसशी बोलून घ्यावं.

त्याने खूपच छान समजावलं मला. नाही तरी त्याची पद्धत, खूपच चांगली असते. त्याने मला सध्याची कंपनी सोडण्याचे, माझ्या नवीन कंपनी नंतरचे थोडक्यात सांगायचं झाल तर माझ्या करिअर विषयी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले. कामाच्या आणि शिकायच्या दृष्टीने माझी सध्याची कंपनी खूपच चांगली आहे. कारण मला वाटत नाही की, मी वेब मध्ये फार काही येत. अजून बरंच काही आहे शिकायला. पण आर्थिक अडचणी प्रत्येकालाच असतात. मला सुद्धा आहेत. आत्तापर्यंत मी नेहमी कमाईपेक्षा कलेला अधिक प्राधान्य आणि महत्व दिलेले होते. पण यावेळी मी कमाईला अधिक महत्व देत आहे. असो बाकी बोलूच.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.