आयटीतील म्हणी


आयटीतील म्हणी 🙂

 • मायक्रोसॉफ्ट तिथ बग.
 • पीएम आला आणि लेक्चर देवून गेला.
 • आपला तो टास्क दुसऱ्याचा तो टाईमपास.
 • रात्र थोडी टास्क फार.
 • बॉस पाहून काम करावे.
 • आपलाच प्रोजेक्ट आणि आपलाच बग.
 • बॉस बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले.
 • चार दिवस डेव्हलपरचे चार दिवस टेस्टरचे.
 • कोडमध्ये नाही तर साईटवर कुठून येणार.
 • कोड येईना ब्राऊझर इशु.
 • जैसा क्लायंट तैसा प्रोजेक्ट.
 • ट्रेनींमध्ये ट्रेनर शहाणा.
 • बिल्ट फेल झाल्यावर कोड करणे.
 • नावडत्या इम्प्लोईचे कामच स्लो.
 • प्रोजेक्ट रन केल्याशिवाय बग दिसत नाहीत.
 • डेव्हलपर रडतात टेस्टर हसतात.
 • आधीच बॉस त्यातून प्रोजेक्ट गंडला, त्याची क्रिडा काय विचारता?
 • इकडे बॉस तिकडे क्लायंट.
 • ऐकावे कलीगचे करावे बॉसचे.
 • एप्रीसीएशन नको पण प्रोजेक्ट आवर.
 • बॉसला सतत बरोबर म्हटल्याशिवाय सिनिअरपण येत नाही.
 • कंपनीत राहून मॅनेजरशी वैर.
 • रिझाइन लेटर टाकल्याशिवाय बॉस इंपॉर्टेन्स देत नाही.
 • कंपनी मोठी काम छोटे.
 • आधीच कामाचा कंटाळा त्यात नेट डाऊन.

म्हणी फक्त हसण्यासाठी!


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.