इंग्लिश


या नवीन कंपनीत आल्यापासून या दोन भाषेचा वापर होतो आहे. इंग्लिश माझ फारच खराब आहे. पण सध्याला बोलतोच. आतापर्यंत मी माझ्या कामाचा वेग आणि कामाचा दर्जा कसा सुधारला जाईल एवढंच बघत होतो. आता त्यापेक्षा अधिक माझ इंग्लिश बोलण कस सुधारेल याकडे लक्ष देत आहे. मुळात इंग्लिशची भीती वाटत नाही आहे. आणि इंग्लिश फ़क़्त कंपनीच्या कामापुरती वापरणार. मराठी भाषा ही कधीही सर्वोच्य आहे. मी हिंदी भाषा आता वापरण जवळपास बंदच केल आहे. जानेवारी महिन्यात मी मोजून दोन वेळेस हिंदीत बोललो. आजकाल त्याच देखील हिशेब ठेवतो. या महिन्यात दोनदा हिंदीचा वापर केला आहे. मुळात भाषा हे एक माध्यम आहे. इंग्लिश या वर्षात पक्क करून टाकील. मध्यंतरी ते रिलायन्स कंपनीचे डेटाकार्ड घेतलं तर त्यांचे आजकाल खूप फोन येतात. मग त्याचाही मी माझ्या ‘इंग्लिश’ सुधारण्यासाठी उपयोग करून घेतो.

कुठल्याही कस्टमर केअर मध्ये फोन केला की, मराठी बोलणारा त्यांच्याकडे त्यावेळी तिथे उपलब्ध नसेल तर ‘इंग्लिश’ चा वापर करतो. नाही तरी बोलल्या शिवाय कस येणार? पण बाकी इतर ठिकाणी म्हणजे माझा संगणक, माझे इमेलची सगळी खाती, सोशल नेटवर्किंग वेबसाईटमधील माझी माहिती मी मराठीत ठेवण्यात यशस्वी झालो आहे. या कंपनीतील माझा पहिला इमेल कोणालाच कळला नाही. मग त्यावेळी ठरवून टाकल. इंग्लिश चांगल आल पाहिजे. दोन महिन्यात ‘इमेल’ मध्ये सुधारणा केली आहे. आता मी पाठवलेले मेल चुकत नाहीत. तसचं ‘इंग्लिश’ देखील बिनचूक येईल.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.