इंधन दर जास्ती कशासाठी?


इंधन दरात भाववाढ होणे याचाच अर्थ महागाई वाढणे. कारण, इंधनाचा थेट परिणाम वाहतुकीवर व पर्यायाने दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमतीवर होतो. वाहतूक खर्च वाढला तर उत्पादनाच्या निर्मितीचा खर्च वाढतो. जो वस्तूची किंमत वाढून वसूल केला जातो. हा सामान्यांना जितका त्रासदायक आहे तितकाच सरकारी पातळीवर आनंद देणारा आहे.

कच्चा तेलाची आयात व त्यावरील प्रक्रिया करून तो विक्रीसाठी उपलब्धतेची किंमत साधारण (पेट्रोल) ₹ ३०-३५ इतकी होते. आपण आज ₹ ८४-८८ त्यासाठी मोजतो. थोडक्यात, वरील सर्व कर रूपाने आपण भरतो. कोणतेही सरकार कितीही जनतेच्या हिताच्या गोष्टी बोलो जेंव्हा जागतिक पातळीवर कच्चा तेलाचे दर वाढतात तेंव्हा सर्व सरकारांना आनंदाचीच गोष्ट आहे. आणि जागतिक बाजारपेठेत कच्चा तेलाचे भाव एक डॉलरने जरी कमी झाले तर सरकारची ८६५० कोटी रुपयांची बचत होते. सोप्या भाषेत नफा होतो.

जेंव्हा मनमोहन सिंह यांचे सरकार होते तेंव्हा कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरेल १४५ डॉलर इतके वाढलेले. त्यावेळी पेट्रोच्या भावांनी आजचा दर गाठलेला. आज जागतिक पातळीवरील कच्च्या तेलाचे प्रति बॅरेल भाव साधारण ८० डॉलर इतका आहे. याचा सरळसरळ अर्थ आताच्या किमतीपेक्षा कितीतरी कमी व्हायला हवे. ते नाहीत याच कारण मनमोहन सिंह यांच्या काळातील एकूण करात नव्या सरकारने १२२% इतकी प्रचंड वाढ केली. जी आताही त्यांना सोडायची नाही. थोडक्यात आपण बऱ्याच चढ्या दराने इंधन खरेदी करत आहोत. पुढील काळात सरकारने वाढवलेला कर जर कमी केला नाही तर आपल्याला पेट्रोलचे भाव तीन आकड्यातही पाहायला मिळतील!

सरकार जनतेच्या भल्यासाठी असायला हवी. रिलायन्स कंपनीकडून देशांतर्गत कच्चा तेलाच्या किमती खरं तर कमी असायला हव्या पण त्यांच्या भल्यासाठी आज सरकार जगातील बाजारभावाप्रमाणे तेल खरेदी करते! अशा अनेक गोष्टी आहेत ज्या खरतर चुकीच्या चालू आहेत!


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.