इंश्योरेंस पॉलिसी


काही दिवसांपासून मला अनेक कंपन्यांचे फ़ोन येत आहेत. नाही, तस म्हणजे मला बऱ्याच आधी पासून कंपन्यांचे फ़ोन यायचे पण ते माझ्या नोकरी बद्दल असायचे. हे जे आजकाल फ़ोन येत आहे, ते इंश्योरेंस कम्पनीं कडून. प्रत्येक जन त्याची पॉलिसी किती छान आणि फायदेशीर आहे. याचे तो विश्लेषण करतो. यात तुमचा कसा आणि किती फायदा आहे याचे तो / ती साविस्तर वर्णन चालू असते. मला एक गोष्ट कळत नाही की यांना माझा मोबाइलचा क्रमांक कसा सापडतो हेच कळत नाही.  मध्यंतरी एका मुलीचा फ़ोन आला याचा इंश्योरेंस संदर्भात.

बर ती पुणेकर होती. म्हणजे तिचा क्रमांकाची सुरवात ०२० ने होती यावरून म्हनत आहे. बाई साहेबांनी आपला तोंडाचा पट्टा चालू केला. की तुम्ही असा असा आमचा प्लान घ्या. बर माझ काही एकून घेण तर सोडाच पण तुम्ही हा प्लान घ्याच असा आदेशच बाई साहेबांनी सोडला. मग मी त्या मुलीला म्हणालो की मी तो प्लान घेउन ३ महीने झालेले आहेत. परत मी तो प्लान का घेऊ. झाल बाई साहेब हिरमुसल्या. मला नक्की हेच कळत नव्हत की ही मला प्लान सांगत आहे की माझी प्रेयसी, जी ती माझ्यावर एवढा रुबाब दाखवत आहे. मग परत बाई साहेबांचा प्रेमळ सन्देश (आदेश) की, थोडी तरी इन्वेस्मेंट कराच. मग मी तिला स्पष्टच सांगितल की, मला ते जमणार नाही आणि मी सध्याला घेण्याच्या मनस्थितीत (परिस्थितीत) नाही. आणि फ़ोन बंद करणार तेवढ्यात तिचा एक प्रश्न “तुमचे लग्न झालेले आहे का?”.

तस म्हणायला गेल तर माझ वय आणि कुठ काम करतो. हे आधीच विचारले होते. ते वरती नमूद करायचे राहुनच गेले. मी गोंधाललो ,असा थेट प्रश्न कसा विचारला. मी विचारला की अस का विचारित आहात. म्हणजे लग्न झाल्यान्साठी काही विशेष योजना आहे काय तुमच्याकडे? मग ती  नाजुकाशी हसली आणि नाही म्हणाली. मी तिला माझे लग्न झालेले नाही असे सांगितल्यावर ती थोडा वेळ घेउन मला म्हणाली. की जर तुमचे लग्न झाले असते तर मी तुम्हाला ही पॉलिसी तुमच्या बायकोला घेउन दया अस म्हणाले असते. (पण हे ऐकल्यावर बाई साहेब जाम खुश झाल्या होत्या). मग जणू काही माझी होणारी बायको आहे अशा स्वरात की काही तरी मार्ग काढाच, असे प्रेमळ विनवणी करू लागली.

मग आता तिला काय सांगुन कटवाव असा प्रश्न मनात निर्माण झाला. मग मी तिला माझ्या लहान भावाला विचारून सांगतो अस म्हणुन फ़ोन ठेवणार तेवढ्यात बाई सहेबची मंजुळ वाणी अधिकच मंजुळ झाली आणि मला पुन्हा एकदा नाव व् फ़ोन क्रमांक  सांगुन मी पुन्हा कधी फ़ोन करू अशी विचारना केली. दोन दिवसानी फोन करा असे सांगुन मी फोन बंद केला. मला नाही आठवत की मी कोणत्या मुलीशी २५ मिनिटे बोललो असेल. असो, दोन दिवसानी तिचा फ़ोन मी नसताना माझ्या वरिष्ट अधिकारयाने उचलला. आणि मग कधी परत तिचा फ़ोन आलाच नाही. पण आता कधीही एखाद्या इंश्योरेंस कंपनीचा फ़ोन आला तर मी मात्र क्षमा करा म्हणतो आणि फ़ोन बंद करतो.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.