इडियट


इडियट हा शब्द ‘सॉरी’ प्रमाणेच भारतात आला. नाही मी तुम्हाला इतिहास सांगणार नाही आहे. आज दुपारी कंपनीत नेहमी प्रमाणे मी माझ्या सहकार्य बरोबर जेवायला बसलो. आमच्या कंपनीत माझा एक मित्र आहे, म्हणायला तो  ऑफिस बॉय आहे. पण त्याला मी कधीच तस समजल नाही. आणि तो पण कधी तस वागला नाही. त्याचे बोलणे पण तस नाही. नेहमी जेवताना तो त्याच्या डबा तो बाकी सगळ्याना आग्रहाने देतो. त्याच्या मानाने तो तो फारच कमी जेवतो.

कधी एकटा जेवण करायचे म्हटले की, त्याला जेवणात रस नसतो. अस काही नाही बाकीचे आपल्या डबा इतराना देत नाही अस नाही. देत नाही तो मी एकटाच. काय करणार कधी उष्टे खाऊ नये असे आईने शिकवलेले. बर ते सोडा मी म्हणत होतो, की आज दुपारी जेवताना त्याने घरून येतना एक  पुरणाची पोळी आणली. झाल त्या दान शुराने प्रथम बाकी माझ्या सहकार्याना घ्या म्हणाला. झाल ताबद्तोप १० मिनिटात साफ. मी हे बघत होतो. त्याने एखादाच घास खाल्ला असेल. त्यातील एक माझी सहकारी आहे, तिला नेहमी तिचा डबा आवडत नाही. बर ती बनवते असे नाही. एका डबे वाल्याकडे डबा लावला आहे. तो काय थोडीच हिच्या आवडीची दररोज भाजी बनवणार आहे? बर तिच्यात मुलीचा एक पण गुण नाही. कोणत्या अर्थाने तिला मुलगी म्हनाव असा प्रश्न पडतो.

थोड्या फार फरकाने बाकी आमच्या कंपनीतील सगळ्याच बायका तशा आहेत. हो बायका, कारण त्या कधी मुली प्रमाणे वागतच नाही. ते जाऊ द्या तर ह्या बकासुरानी त्या पूरणपोळीचा फडशा पाडला. बर खाउन समाधानी रहावे ना. ते नाही. ते बघून त्याने आपले म्हटले की,माझ्या मामीने मला दोन पोळ्या दिल्या होत्या, पण मी एकाच आणली. झाल लगेच त्या बकासुराच्या वदनी ‘इडियट’ असा शब्द आला. थोड्या वेळा पूर्वी ज्याने आपले उदर भरले त्याला इडियट. बाकी च्या बाकीच्या  लगेचच त्यात हो घातला . दोन सेकंदासाठी त्याचा चेहरा उतरला होता.  दिल्याची ज्याला किंमत नसेल त्याला देण्याचा काय फायदा. बघून मला त्या बकासुराचा खरच राग आला होता. ती गेल्यावर त्याला समजावले की परत काही देवू नकोस म्हणुन. असल्या बकासुर   इडियटची लायकी आहे का  दुसर्याला इडियट म्हणायची?


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.