इतिश्री समाप्ती. बऱ्याच दिवसांपासून ठरवतो आहे. आज, तेच सांगायचं ठरवून आलो आहे. वर्डप्रेसच्या होस्टिंगवर ब्लॉग करण्यापेक्षा स्वतःचा एक नवीन ब्लॉग बनवावा अस म्हणतोय. बऱ्याच दिवसांनी ‘दर्शन’ देतोय. म्हणून विषय सुरु करण्याआधी क्षमा मागतो. खर तर हा ब्लॉग म्हणजे आठवणी. दोन तीन वर्षापूर्वी तर जीवनाचा एक भाग बनून गेलेला. नंतर मग.. सगळंच बदललं.
असो, हा ब्लॉग बंद करावा. आणि नवीन ब्लॉग एका वेगळ्या डोमेननेम घेऊन नव्याने सुरु करावा. जेणेकरून वर्डप्रेसच्या होस्टिंगवर येत असणाऱ्या अडचणीही दूर होतील. आणि नव्याने पुन्हा श्रीगणेशा होईल. हे सांगण्यासाठी हा दिवस निवडला अस नाही. कदाचित योगायोग. समस्त भूतलावरील ‘जोडप्यांचा’ राष्ट्रीय सणाच्या दिवशी मी समाप्ती करतोय. खर बोलायचं झाल तर, काही गोष्टी आपण कितीही अमान्य केल्या तरीही त्या कायम आपल्या जीवनाचा हिस्सा बनतात. कितीही टाळल तरीही त्या विसरणे शक्य होत नाहीत. आणि पुन्हा त्या ठिकाणी आल्यावर त्याच आठवणींना उजाळा मिळतो.
विचारांचा रस्ता कधी संपत नाही. घडलेल्या घटनांचे वेगवेगळे पैलू सामोरे येतात. त्यामुळे भूतकाळात आपल्याला फसवल्याची भावना निर्माण व्हायला जागा निर्माण होते. आणि न संपणारा विचारांचा प्रवास सुरु होतो. त्याने अनेकदा, वर्तमानातील घटनांशी संदर्भ जोडला जातो. असो, फार पकवत नाही. नवीन ब्लॉग बनला की, एका नोंदी द्वारे नक्की कळवतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट. चूकभूलीने माझ्याकडून कोणी दुखावला गेला असेल तर त्याची माफी मागून ह्या ब्लॉगची समाप्ती करतो.