इमेल


आता दुपारी मी तिला असाच एक मेल पाठवला होता. आणि तिने त्याचा रिप्लाय देखील केला. आणि पिंग देखील केल. काय सांगू, नाचावस वाटत आहे. आजही दुपारपर्यंत दिवस जाम टेन्शनमध्ये गेला. म्हणजे अस काहीच कारण नव्हते. ती आज काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये असली छान दिसते आहे ना! तिला ‘हाय’ करणार होतो. सोडा, मी पुन्हा तेच रिपीट करतो आहे. आज दुपारी जेवायला त्या नव्या कॅन्टीनमध्ये गेलो होतो. पण तीच माझ्याकडे लक्षच नव्हत. म्हणजे तिला कळल सुद्धा नाही, की मी होतो तिथे. यार माझ्या मनाचा ‘रिमोट’ तिच्याकडे गेल्याप्रमाणे वाटत आहे.

ती हसली की सगळ छान! नाहीतर.. पुनः सुरु झालो. जेवण करून आल्यावर मी माझ्या फ्लोरवर येत असतांना जिन्यात ती भेटली. पण पुन्हा माझी नाही होत होती हिम्मत. मग तिने ‘हाय’ केल. काय हाय होत ते! वर आलो तरी श्वास.. डेस्कवर बसल्यावर मी तिला एक मित्राने पाठवलेला मेल फोरवर्ड केला. त्या इमेलमध्ये ‘फोटो-पे-शेर’ अशी स्पर्धा अस लिहील आहे. आणि खाली नियम आहेत. दोनच आहेत. एक आहे, फोटो एका मिनिटात कळायला हवा. आणि फोटो सोबत एक ‘शेर’ हवा असा दुसरा नियम. त्याच्या खाली एक फोटो आहे. त्यात वाळवंटात एक गाढव आहे. आणि त्याने त्याच्या पुढच्या उजव्या पायाने कानाला मोबाईल पकडला आहे. त्याच्या खाली अजून एक प्रश्न आहे की, ‘तुम्ही एखादा पाठवू शकता काय?’ असा. त्या खाली ‘आमच्या स्पर्धेच विजेते श्री. कवी शेर ओडकर’ त्यांचा शेर आहे.

अर्झ है…

हर समुंदर में साहिल नहीं होता|
हर जहाज में मिसाईल नहीं होता|
अगर धीरूभाई अंबानी नहीं होता|
तो हर गधे के पास मोबाईल नहीं होता||

असा होता मेल. तिने ताबडतोप असा रिप्लाय केला.

इस रेगीस्तान में नही मिलेगा बेवरेज!!!
तो इस गढे के मोबाईल पे कहा से आ रहा है कवरेज!!!!!

वाह वाह!!

काय सांगू, किती आनंद झाला आहे. तिला मी ‘स्माईल’चा रिप्लाय पाठवला. त्यावर तिने मला पिंग करून ‘स्माईल’ दिली. मस्त अगदी! असो, बाकी बोलूच!


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.