इलेक्शन कार्ड


यावेळचा दसरा मी गावी साजरा केला. काल नगरमध्ये राज ठाकरेंची सभा झाली. परवाच वडिलांनी मला माझे निवडणुकीचे आलेले ओळखपत्र दिले. ते बघून असे वाटले की, फोटो कॉपी करून दिले असावे. लेमिनेशन तर एकदम फालतू. थोड ओढलं कि, निघून येईल. बर त्यातलं छायाचित्र ब्लाक अन्ड व्हाईट. मी तर रंगीत छायाचित्र जोडलं होत त्या फॉर्मला. माझ नाव, वडिलांचं नाव ठीक. पत्ता देखील बरोबर. पण जन्म वर्ष चुकीचे. बर वडिलांचे ओळखपत्र तर काही विचारूच नका. नावात गोंधळ. आडनाव ‘आठल्ये’ च्या एवजी ‘आढळले’. बाकी पत्ता ठीक होता. आईच जुनंच कार्ड असल्याने ते ठीक होत. वडिलांनी थोड्या चुका दुरुस्त करण्यासाठी दिलं होत. ते अधिक चुका होऊन आल होत.

लहान भावच काही मी बघितलं नाही. बहुतेक आलंच नसाव. मित्रांचे तर काही विचारूच नका. कोणाचे नाव तर कोणाचे आडनाव. तर कोणाचा पत्ता. मला हे कळत नाही कि निवडणूक आयोगाला काही पैसे कमी पडतात का? का त्यांना कामात इच्छा नाही? कार्ड एकदम फालतू. एकद्याच चुकून पाण्यात पडल तर गेलच म्हणायचं. कोणाचंच कार्ड चुका नसलेलं. सगळ्यात काही ना काही घोळ. बर त्या फॉर्मवर लिहून दिलं होत नाव आणि आडनाव. बघून देखील चुका करतात. मला वाटत सरकार निवडणूक आयोगाला बहुतेक पैसे कमी देत असावेत. त्यामुळे स्टाफ भंगार नेमला आहे. जाऊ द्या ते आल हेच मोठ समजल पाहिजे. सरकारी कर्मचारी वर्गाला शिव्या द्याव्यात अस वाटत आहे. कोणत्याच कामात बिनचूकपणा नाही. सगळीकडे गोंधळ. बर कर काय आम्ही भरत नाही का? की आम्ही अंगठे बह्हादार आहोत. की यांच्या चुका आम्हाला कळणार नाहीत.

माझे वडील मला म्हणाले सरकारी लोक त्या उमेदवाराच्या योग्यतेपेक्षा त्याच्या जातीकडे बघतात. खर तर ज्याच काम त्यानेच कराव. मी जातीयवादी नाही पण हा गोंधळ बघून आपल सरकार जातीयवादी आहे हे नक्कीच म्हणेन. फ़क़्त कोटा पूर्ण करायचा. येत काय हे न बघता त्याला नेमायचं. मग तो करतो आठल्येच्या एवजी आढळले. पैसे जनतेचे वाया जातात.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.