उद्योगवर्धिनी


उद्योगवर्धिनी म्हणजे उद्योगाचा विकास. खरं तर व्यवसाय आपला मूळ पिंड मुळीच नाही. तरीही अनेक मराठी उद्योजक यशस्वीरीत्या व्यवसाय उभा करीत आहेत. याबाबत आपण चर्चा करायला हवी.

प्रत्येकाच्या जीवनातील बराचसा काळ हा पोटापाण्यासाठी जातो. तेच मुख्य ध्येय अशा स्वरूपाचे आज वातावरण आहे. मध्यमवर्गीयांबाबत बोलायचं झाल्यास ते जवळपास अख्ख आयुष्य त्यासाठी वेचतात. गरीब आणि श्रीमंत हे ठरवणारी गोष्ट म्हणजे पैसे वा संपत्ती.

मराठी माणसांचा जन्म ह्या देशाच्या रक्षणासाठी झालेला आहे. त्यामुळे कदाचित मराठी माणूस विचार करतांना वैयक्तिक अर्थकारणाला हवे तेवढे महत्व देत नाही. त्यामुळे कदाचित मराठी व्यावसायिक एका ठराविक प्रमाणात आहेत.

परंतु, गेल्या काही काळापासून ह्यात बदल होत आहे. आजूबाजूच्या रोजगारांच्या संधीमध्ये होत असलेला चढउतार व अन्य घटनांमुळे तो व्यवसायाकडे वळत आहे. ही आनंदाची बाब आहे.

कोणताही उद्योग सुरु करणे सोपे असते. त्यात, सुरवातीला आनंदही असतो. पण तो उद्योग सुरु ठेवण्यासाठी अनेक गोष्टींचे ज्ञान आणि कृतीची आवश्यकता असते. अनेकदा ज्ञान वा मार्ग माहित नसल्याने वेळेचे व आर्थिक नुकसान होते.

जगाचा विचार करायचा झाल्यास पहिल्या पाच वर्षात निम्मे उद्योग बंद पडतात. कोरोना व टाळेबंदीच्या काळात कदाचित हे प्रमाण अजूनही वाढले असेल. त्यामुळे नवनवे मार्ग चोखंदळून पाहणे आवश्यक आहे!

उद्योग उभा करणे म्हणजे एखादे साम्राज्य उभे करण्याप्रमाणेच असते! तुमच्या बुद्धिकौशल्याने व मेहनतीने तुम्ही त्याला मोठे करू शकता. तुमचे कौशल्य अन वेळेचे भान जेवढे अधिक तेवढा उद्योग लहान मोठा.

अनेकदा परिस्थितीमुळे उद्योगाला मोठा फटका बसतो. त्यातून मार्ग न निघाल्यास तो बंद देखील करण्याची वेळ येते. प्रत्येक उद्योगावर अशी वेळ येते. त्यातून आपण कसे सावरतो हे खरे कौशल्य!!

मी ह्या क्षेत्रात फार ज्ञानी नसल्याने कदाचित फारसे विचार मांडू शकत नाही. परंतु, माझ्या अनुभवानुसार आपल्याकडे उद्योगाला हव्या असणाऱ्या कौशल्य वा गोष्टी नसेल तर त्या आपण शिकू शकतो. किमान आपण अनुभवातून हे ज्ञान नक्कीच मिळवू शकतो!!

सुदैवाने उद्योगासाठी शासकीय पातळीवर जरी अनास्था असली तर सार्वजनिक ठिकाणी ह्याला मागणी आहे. आपण आपले ग्राहक व बाजारपेठ कुठं आहे ह्याचा शोध घेतला तर उद्योग चालू वा वाढू शकतो!!

कोणताही उद्योग करतांना गोड वाणी, संयम आणि चिकाटी हे प्राथमिक निकष आधी आपण अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे!

,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.