एकदा तरी


एकदा तरी! मी स्वतःला बदलायचा प्रयत्न करीत आहे. गेले दोन दिवस खूपच ‘कठीण’ गेले. कठीणच शब्द योग्य आहे. क्षणाक्षणाला सगळेच बदलते आहे. मी तिचा विचार कमी करायचा खूपच पर्यंत करीत आहे. यार पण हे प्रेम, एखाद्या आगीप्रमाणे आहे. मनाची मशाल उलट केली तरी ही आग पुन्हा वरच्या दिशेने. काय करू? ती दिसली की, मी मनात ‘तिला आपल्याबद्दल काहीच वाटत नाही’ असा जप सुरु करतो. किती कठीण आहे यार हे माझे मन. माझेच ऐकत नाही आहे.

जितका विचार टाळतो. तितका विचार वाढतो. आणि ती असल्याचा इतक्यांदा भास झाले ना! मी मुद्दाम नाही करीत  आहे. आधीपेक्षा आता आणखीन ती आवडू लागली आहे. आज आईने माझ्या रिझ्युमची प्रिंट आउट काढून आणायला सांगितले आहे. काय करू? मला तीच हवी. किती ‘ओढ’ वाढवणार ती! एकदा तरी माझ्या जवळ यावे माझ्याशी बोलावे. असो, मी पण काय बडबडतो आहे. पण खरच आता तिने यावे असे खूप खूप वाटत आहे. ती समोर दिसते. वाटते ती माझ्याशी बोलेल. पण तीचे लक्षच नसते.

एकदा तरी माझ्याकडे पहावे. आज त्यासाठी ह्या प्रोफेशनल लाईफ मध्ये पहिल्यांदाच टीशर्ट घालून आलो आहे. म्हटलं थोडे वेगळे, केल्यावर निदान माझ्याकडे पाहिल तरी. मी काय करू? तीच सोडून मला दुसरे कोणी नको. मला माहीत आहे, हे सगळे अशक्यच आहे. मी हा सगळा मूर्खपणा चालवला आहे. पण तरीही एकदा तरी. माझ्यात काहीच नाही, हे मला माहिती आहे. ती सगळ्याच गोष्टीत माझ्याहून छान आहे. मी कुठे नाही म्हणतो आहे. पण देवाने अस का केल? मला असले ‘रडके मन’ का दिले? कशाला अस केल? चूक माझीच आहे. मी या कंपनीत नसतो तर ती भेटलीच नसती. आणि मी इतका अधीर देखील झालो नसतो. किती अधीरता वाढवणार ती? आणि आता ती स्वतःहून जोपर्यंत माझ्याशी बोलणार नाही, तोपर्यंत मी तरी तिच्याशी बोलणार नाही. किती भाग्यवान आहेत तिचे ‘मित्र’!. देवा, एकदा तरी!


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.