एक छोटी बातमी डोंगरा एवढी..


रात्री एक भयानक घटना घडली. घडलेली घटना खर तर खूपच चीड आणणारी होती. कोणत्याही व्यक्तीच (राजकारणी सोडून) डोके फिरेल अशी होती. बातमीने सारा देश हादरला. झालं! निमित्त सापडलं. ‘सबसे तेज..’ वाल्यांपासून ते ‘एक पाउल पुढे..’ पर्यंत सर्वांनीच त्या बातमी रुपांतर ‘टीआरपी’ मध्ये बांधण्याचा चंगच केला.

झालं दिसेल त्याला पकडायचे आणि प्रतिक्रियांचा सपाटा. कोणी काहीही बोलो, सगळयाच गोष्टींचा संबंध त्या रात्रीशी लावायला सुरवात केली. सुरवात पोलिसांपासून केली. आधी गुन्हेगारांना का पकडले नाही म्हणून. आणि नंतर आधीच का घटना हाताळता आली नाही म्हणून. एखाद्या पिसाळलेल्या ‘कुत्र्याप्रमाणे’ मागे लागले. यातून जनप्रक्षोभ वाढत होता. त्याची फिकीर कुणाला होती? बस्स! ‘टीआरपी’ हेच ध्येय. पाच सेकंदाची ‘क्लिप’ दिवसभर फिरवायची. आणि रात्र झाली की टोळक्याने चावडीवर बसल्याप्रमाणे ‘अक्कल’ पाजाळायाची.

विषय संपतो अस वाटला की, नव्या रात्रीचा शोध सुरु. नाहीच भेटली तर, कोणी काय बोलेले तर, त्याचे अलीकडचे पलीकडचे काढून टाकायचे आणि हवे तेवढे दाखवायचे. जे पाहून समाज पुन्हा अस्थिर कसा होईल, वाद कसे वाढतील. आणि त्यामुळे आपले टीआरपी कसे वाढेल याचाच विचार. ‘बातमी’ आहे की ‘विष’ आहे? घटना, पिडीत व्यक्ती, सबंध समाज, सरकार या सर्वांचीच ‘स्वातंत्र्याच्या’ नावाखाली होणारा अपमान म्हणजे ‘टीआरपी’. कुठेही घटना घडो. आधी दोष ‘पोलिसांना’, नंतर ‘राजकारण्यांना’, पुढे जाऊन ‘सरकार’. सगळ झालं की शेवटी दोष द्यायचा ‘समाजाला’. जणू काही हे पापभिरू. देवाने फक्त अक्कल यांनाच दिली. ‘अक्कल’ वरून आठवलं. ‘बातमी’ मागची सत्यता तपासल्या खेरीज मत बनवणे म्हणजे ‘मेंढरूच्या’ कळपात एक ‘मेंढी’ बनण्याप्रमाणेच आहे.

,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.