एक देश एक भाषा संकल्पना


एक देश एक भाषा संकल्पना ही मुळातच भारतीय नाही. एका जर्मन तत्वज्ञ जोहान गोटलिब सतराव्या शतकात मांडली. व तिला अधिकृत स्वरूप मिळवून दिले.
दुवा- https://babelzine.co.uk/wp-content/uploads/2018/11/No25-Article-Language-and-nationalism.pdf

त्या आधी सोळाव्या शतकात जर्मनीत लॅटिन भाषेचा सरकारी कामकाजात वापरातून राष्ट्रीय भाषेच्या संकल्पनेला जन्म दिला. मूळ बायबल लॅटिन भाषेत लिहिलेले. आजही ती राष्ट्रभाषा म्हणून व्हॅटिकन सिटी (ख्रिश्चनांच्या सर्वोच्च पदाच्या मानकरी असलेल्या पॉप यांच्या देशात) वापरली जाते.

खरं तर देशभक्ती अन भाषेचा तसा कोणताच संबंध नाही. परंतु, एक ध्वज, एक राष्ट्रगीतप्रमाणे तिचा वापर होऊ लागला. खरं तर हे सगळं सांगण्याचा खटाटोप केवळ यासाठी की परकीय संकल्पना आपल्याकडे उपयोगी ठरेलच असे नाही.

१९२५ साली कराचीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बैठकीत हिंदुस्थानी भाषा ही भारताची राष्ट्रभाषा व्हायला हवी असा ठराव संमत झाला. काही वर्षांनी नागपूरमध्ये हिंदी साहित्य संमेलनात महात्मा गांधींना आमंत्रित करून त्यांच्यापुढे विनंती करण्यात आली. याच संमेलनानंतर राष्ट्रीय काँग्रेसने आपल्या ठरावात हिंदी-हिंदुस्थानी असा बदल केला.

पुढे जाऊन इंदोरच्या साहित्य संमेलनात याला धार्मिक वळण लागले. हिंदी प्रचार सभेच्या स्थापनेनंतर संस्कृतप्रचुर हिंदीला मुस्लिम लीगने विरोध करणे सुरु केले. हिंदी ऐवजी उर्दू ही राष्ट्रभाषा व्हावी अशी मागणी त्यांच्याकडून केली जाऊ लागली.

मे १९४२ मध्ये महात्मा गांधींनी हिंदुस्थानी प्रचार सभा नावाने एक नवीन संस्था सुरु केली. जी पुढे जाऊन राष्ट्रीय काँग्रेसच्या ठरावाच्या बाजूने उभी राहिली. अशा पद्धतीने नवीन हिंदी, हिंदुस्थानी व उर्दू राष्ट्रभाषा बनवण्यासाठी स्पर्धक बनल्या.

भारताबाहेरही अशाच पद्धतीच्या गोष्टी घडत होत्या. आयरिश भाषा आयर्लंडची राष्ट्रभाषा व्हावी यासाठी हिंसक आंदोलन झाले. आणि आयरिश अन इंग्लिश यात दरी निर्माण झाली. पुढे जाऊन त्यांनी आयरिश ही राष्ट्रभाषा निवडली.

पुढे जाऊन पोलंड देशासंदर्भात पॉलीश ही भाषा हेही याच पद्धतीने धगधत होते. अरबांनी इराण काबीज केल्यानंतर इराणी भाषेच्या राष्ट्रभाषेसाठी आगडोंब उसळला. तुर्कीतही तुर्की राष्ट्रभाषा करण्यासाठी हेच घडले.

या सगळ्या घटना आपल्या लोकांनी भाषेला आपल्या संस्कृतीचे माध्यम मानून ते टिकवण्याची धडपड दर्शवितात.

भारतासंबंधी बोलायचे झाल्यास असे भाषा बोलणारे वेगवेगळ्या गटाला प्रांत म्हणून संबोधले जाऊ लागले. सहाव्या शतकात बुद्ध संस्कृतीच्या उदयानंतर संस्कृतचा लोकभाषेप्रमाणे वापर थांबला. बुद्ध आणि महावीर यांच्या धार्मिक संकल्पना भाषांमध्ये परिवर्तित होऊ लागल्या.

पुढे जाऊन संस्कृत भाषेचा पाली व अर्ध मागधी अशात प्रवास सुरु झाला. तत्कालीन भाषेचा विचार करायचा झाल्यास पाली ही राष्ट्रभाषा बनली. बाराव्या शतकात या सर्वांची जागा प्राकृत भाषेने घेतली. याच भाषेने अनेक भाषांना जन्म दिला.

परकीय आक्रमणे व गुलामीच्या काळात पर्शियन, खरी बोली, हिंदुस्थानी या भाषा विकसित झाल्या. सध्याची हिंदी नेमकी कधी जन्माला आली यावर अजूनही संशोधन झालेले नाही. त्या भाषेसंबंधी पुरावे म्हणून एकही लेख/पुस्तक उपलब्ध नाही.

आज भारतात १७९ भाषा व ५४४ उपभाषा आहेत. सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या २२ भाषा ह्या सरकारी मान्यताप्राप्त आहेत.

एकोणिसाव्या शतकातील शेवटच्या साठ वर्षात हिंदीचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला. अन हिंदीचा राष्ट्रभाषा करण्याच्या राजकीय महत्त्वाकांक्षेने अनेक भारतीय भाषा व उपभाषांचा बळी घेतला. भाषा तज्ज्ञाच्या अभ्यासात गेल्या पन्नास वर्षात २२० भाषा मृत झाल्याची अधिकृत माहिती समोर आलेली आहे.

एक भाषेच्या अट्टाहाने अनेक नानाविविध संस्कृती लोप पावत आहेत! भारतीय संस्कृती ही विविधतेच्या संकल्पनेवर आधारलेली आहे! एक देश एक भाषा ही आपल्या भारतीय संस्कृतीशी न मिळणारी संकंल्पना आपल्यासाठी घातक आहे हे भाषा तज्ज्ञांनी पुराव्यासह सिद्ध केलेली आहे!

त्यामुळे हा अट्टाहास आपण सोडून सर्व भारतीय भाषा व संस्कृती यांचा विकास कसा होईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे!

अधिक माहितीसाठी दुवा – http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00urduhindilinks/tarachand/01problem.html

,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.