एक मोती गळाला


ती आज का नाही आली? तिच्यासोबत एक एक दिवस म्हणजे जीवनातील सर्वात सुंदर क्षण. ती असते तर सर्वच अगदी छान. पण, अस का होत? ती आज नाही आली. सगळ किती छान चालू होत. चार दिवस नाही मोती. एक मोती गेला. बस! आता मोजून चार मोती. त्या ‘शुक्रवार’ नंतर नीट झोपच आलेली नाही. प्रत्येक क्षण, हा प्रत्येक मोती तिच्याविना व्यर्थ. मी मोबाईल घेतला आहे. तो नोकिया एक्स सिक्स. आज वाटले ती येईल. तिला आवडेल. मागील शनिवारी, नाताळच्या दिवशी घेतला. घ्यायचे अस काहीच ठरलं नव्हते. पण, तिला शब्द दिलेला. पाळायला हवा ना!

मुळात माझा ‘मूड’ गेला आहे. कस करू? आज त्या डीएम सोबत बोलण्यातही काही ‘रस’ येत नव्हता. त्याने भेटायला बोलावलेलं. तेच आपल ‘रिलीज’चे लफडे. काय केल आहे यार तिने? बस ती माझ्याशी बोलत राहावी. माझ्या सोबत असावी. माझीच बनून राहावी असंच वाटते. तिची जादू! कोणी खरंच इतके छान कसे काय असू शकते? इतके प्रेमळ? इतके गोड? आणि इतके खरे. एक साधे फोल्डर पाहीले तर मला खर खर सांगितले. आणि ‘सॉरी’ देखील बोलली. सगळ अगदी पहिल्या दिवसापासूनचे आठवते आहे. हा प्रत्येक ‘क्षण’. हा प्रत्येक दिवस. तिच्याशी पहिल्या दिवशी बोलतांना. अगदी तिचे पहिले ‘हाय हेमंत’ पासून ते शुक्रवारचे ‘माझा मूड ऑफ झाला आहे’. सगळ अगदी स्वप्नवत. इतकी सुंदर, इतकी छान मुलगी कधी माझ्याशी बोलेल. अगदी ‘काल का आला नव्हतास?’ अस विचारेल. अस कधीच वाटले नव्हते.

ती किती खरी आहे. किती छान, ‘मला भाकरी बनवता येत नाही’, ‘मला वाचनाची आवड आहे’. स्वप्नात देखील अस कधी नाही झालेलं. पण एक गोष्ट सांगू, तिच्या आवडी निवडी अगदी वेगळ्या. म्हणजे आमच्या दोघांची ‘दोन टोके’ आहेत. पण ती प्रेमळ, गोड. माझ्या स्वप्नसुंदरी पेक्षा हजार पटीने छान आणि प्रेमळ. मी तिच्यासाठी! तिच्या इच्छा, तिला आवडणार्या गोष्टी, अगदी तिचे नाराज होणे, क्षणात पुन्हा हसणे. आणि पुन्हा ‘माझा मूड गेला’ अस बोलणे. मी तिचाच बनून राहील. फक्त तिचा. तिला नाराज नाही करणार कधी. पण पुन्हा मनात विचार येतो, तिला मी का आवडेल? माझ्यात खरंच मी रोज शोधतो. रोज त्या आरशात स्वतःलाच पाहतो. अगदी निरखून. पण काहीच माझ्यात चांगले नाही. आणि ती सगळ्याच गोष्टीत ‘परफेक्ट’.

दोन टोके असली तरी, मी तिला खुश ठेवण्यासाठी जे करता येईल, त्या सर्व गोष्टी.. यार मी हे काय बोलतो आहे. आता चार दिवस फक्त.. त्यानंतर सगळंच.. नको तो विचारच नको. अगदी खर सांगू? मला एक तारखेला मिळाले ऑफर लेटर. पण प्रत्येक दिवस मी तिला सांगायचे ठरवायचो. आणि पुन्हा हे मोती माझ्यापासून हिरावून जावू नये म्हणून मी माझा विचार बदलायचो. बस ती खुश राहावी. ती कधीच नाराज होवू नये. पण तिला मी माझ्या मनातल सांगितल्यावर, ती माझ्याशी बोलेल? मला खरंच काही सुचेनासे झाले आहे. इतक्या सुंदर आणि गोड मुलीला मी नाराज केले तर.. खरंच मलाही ते आवडणार नाही. पण मनातील हे भाव, या इच्छा, ह्या वेदना खरंच नाही स्वतःवर ताबा ठेवून देत. आज सगळंच उफाळून आले आहे. बस! त्यात तिच्या आठवणीने तडफड होते आहे.

ती माझ्यापासून कधीच दूर जावू नये. पण ती अजूनही माझ्यासाठीच आहे अस वाटते आहे. मला माहिती आहे. अजून फक्त चारच दिवस हा सहवास आहे. नंतर.. त्यानंतर मी कसा राहील? स्वतःवर ताबा आहे. पण तिच्याविना जीवन खरंच नकोसे होईल. आजही तेच होते आहे. ती नाही तर काहीच नाही. सगळंच निरस.. ती ठीक असेल ना? तिची तब्येत चांगली असेल ना? यार हे डोक आणि मन खूप गोंधळ घालत आहे. आजचा हा मोती गळला आहे. आणि खूपच अधिक बेकार वाटत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.