ए टी म् म्हणजे एनी टाइम मिस्टेक


पुण्यात ए टी म्  चा अर्थ एनी टाइम मिस्टेक असाच होतो. सरासरी १० पैकी ८ ए टी म्  मधे काहीना काही बिघाड असतोच. कधी दरवाजा ख़राब, कधी पैसेच येत नाही. कधी कार्डच एक्सेप्ट होत नाही. तर कधी आत गेलेले कार्ड बाहेरच येत नाही. पूणे रेलवे स्टेशन ला ६ ए टी म् आणि ८ मशीन आहेत. या महिन्याच्या सुरवातीला सगळ्या ए टी म् मधे एकाच वेळी बिघाड झाला. प्रत्येकात नव नविन बिघाड. यूनियन बैंकच ए टी म् सगळ घ्यायच पण पैसे येत नव्हते. पंजाब नेशनल बैंकच ए टी म् दरवाजा तर कायम बिघडलेला असतो. कार्ड चुकीचे दाखवायचे. त्याच्या बाजूचे स्टेट बैंकच ए टी म् सगळी क्रिया करायचे आणि पैसे येत नसायचे, पण आपल्या खात्यातून आपण टाकलेली रक्कम वजा व्हायची.

केनरा बैंकच ए टी म् तर डायरेक्ट आउट ऑफ़ सर्विस दाखवायचे. उरलेले आईसीआईसीआई ला तर बाहेर बोर्ड लावलेला असायचा. त्याची नक्कल शेजारचे स्टेट बैंकच ए टी म् करायचे. हे दोन्ही ए टी म् एकाच वेळी बंद कसे काय पडतात हे मला न सुटलेले कोडे आहे. कोरेगावमधे तर नविनच नाटक, कोरेगाव मधे स्टेट बैंकचे ३,बैंक ऑफ़ बडोदा चे १, सेंट्रल बैंकचे १, चार्टड च १ आणि एच डी एफ सी च १. पण यातल कोणताच ए टी म् २४ तास चालू नसते. नेहमीच दिवसातून तासभर तरी यात पैसे संपलेले. एकदा मी चिंचवड स्टेशन मधील स्टेट बैंक ए टी म् मधून ५००० रुपये काढले. पैसे आले पण माझ्या खात्यातून ते ५००० वजा झालेच नाही. देहु गावाच्या बाहेर असलेल स्टेट बैंकच  ए टी म् चे शटर कधी उघडलेल बघितलच नाही. शिवाजी नगर च्या  स्टेट बैंक मधून अनेक वेळा फक्त ५०० रुपयाच्या नोटा येतात. म्हणजे कोणाला १००, २०० किंवा ४०० काढायचे असल्यास ते पैसे बाहेर येताच नाही. बाकी ठिकाणी असाच गोंधळ आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.