ऑस्करचा झाला धोबी पछाड़


मध्यंतरी एक मराठी चित्रपट ‘एक डाव धोबी पछाड़’ आला होता. अशोक सराफ, त्याच्या बद्दल काय बोलावे? मराठी अभिनेत्यांचा राजा. चित्रपट हिट झाला.  मी तो पहिला आहे. तुम्हीही बघितला असेल. मस्त चित्रपट. काल सहजच टाइमपास करावा म्हणुन टीवी पाहत बसलो. बिंधास मुव्ही वर एक खुप जुना चित्रपट लागला होता. चित्रपटाचे नाव होते ऑस्कर. बघतो तर काय यात देखील कथा आणि धोबी पछाड़ ची कथा सारखीच. त्यातला नायक देखील एक मोठा गुंड असतो. त्याला एक मुलगी असते. असो चित्रपट तर तुम्ही धोबी पछाड़ बघितला आहे ना. अगदी जसच्या तस.

फरक फक्त इथे नायकाची नायिका नायकावर नाराज असते. आणि तो तिच्या साठी चांगला होण्याचा प्रयत्न करतो. आणि इथे नायक आपल्या वडिलांच्या मृत्यु समयी वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी चांगल होण्याचा प्रयत्न करतो.बाकी काय तर नायिकाच्या पहिल्या भेटीतच नायिका पटते. बाकी कथा दोघांची सारखीच. बघत असताना इंग्लिश धोबी पछाड़ पाहतो असेच वाटत होते. तुम्हाला जर खात्री करून घ्यायची असेल तर असे युट्युब मधे टाकुन बघू शकता. आता पर्यंत आपण हिंदी चित्रपट कथा चोरातात अस ऐकल आणि बघितल होत. पण मराठी सारखे उत्तम दर्जाचे चित्रपट पण आता कथा चोरी करू लागले आहेत. हे बघून काही काळ दुःख झाले. बाकी तस म्हटल तर चित्रपट आणि कथा याला काही तोड़ नाही. पण कथा चोरीची आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.