कशाला व्यर्थ चिंता करतो आहेस? : कंपनीसार


कशाला व्यर्थ चिंता करतो आहेस? कशाला व्यर्थ कामाला घाबरतो आहेस? कोण काम संपवू शकतो? कोण कामाला संपवू शकते? काम ना निर्माण होते, न संपते. जे झाले, ते छान झाल, जे होत आहे, ते चांगले होत आहे. आणि जे होईल ते चांगल्यासाठीच होईल. तू भूतकाळातील कामाबद्दल पश्चाताप करू नकोस. आणि ना भविष्याची चिंता कर. वर्तमान चालू आहे. तुझे काय गेले, म्हणून तू असा रडतोस? तू कंपनीत येतांना तुझे डॉक्युमेंट सोडून अजून काय आणले होते? जे तू गमावलेस? की ज्याचा नाश झाला.

डॉक्युमेंट सोडून न तू काही घेऊन आलास, जे काही घेऊन आलास, जे घेतले ते इथलेच घेतले. जे दिले, तेही इथेच दिले. याच (कंपनी) कडून घेतलेस. आणि त्यालाच दिलेस. मोकळ्या हाताने आला आणि मोकळ्याच हाताने जाणार. जे आज तुझे (डेस्क) आहे. काल त्यावर दुसरे कोणी होते. परवा कोण्या एका व्यक्तीचे होईल. तू हे आपले समजून यात गुंतत आहेस. बस्स हीच प्रसन्नता तुझ्या दुख:चे कारण आहे. परिवर्तन हा विश्वाचा नियम आहे. ज्याला तू एक्सलेशन समजतो आहेस, हीच तर नोकरी आहे. एका क्षण तू कोटी कोटी लोकांचा स्वामी (पीएम) होऊन जातोस, दुसऱ्याच क्षणात तू ज्युनिअर. माझे-तुझे, छोटा-मोठा, आपले-परके हे मनातून काढून टाक, मग सर्व काही तुझे, आणि तू सर्वांचा.

न ही डेस्क तुझी, न तू डेस्कचा. हे कंपनी, इमारत, डिपार्टमेंट पासून बनलेले आहे. आणि त्यातच पुन्हा मिसळून जाईल. परंतु तू(स्वतः) स्थिर आहेस- मग तू कोण आहेस? तू स्वतःला भगवंताला (बॉस)ला अर्पित करून टाक. तोच सर्वोत्तम सहाय्यक आहे. जो या सहाय्यकाला जाणतो तो भयं, चिंता, शोक पासून सर्वदा मुक्त रहातो. जे सर्व काही तू करतोस ते तू त्या भगवंताला अर्पण करीत जा. अस करण्याने सदा नोकरी मुक्त आनंदचा अनुभव करेल.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.