कर्मवाद


कर्मवाद म्हणजे स्वतःच्या कृतीवर विश्वास ठेवणे. विचार करा. अमके करायचे तमके करायचे ठरवतो. पण ते होईल याबाबत आपण साशंक असतो. ते केल्याशिवाय कसे समजेल?

नशीब नावाची गोष्ट केवळ गोष्टीत असते. एखादे अपयश पचवण्यापुरता त्याचा उपयोग. विचार करा, स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्याची चळवळ केलीच नसती तर आज आपण स्वतंत्र झालो असतो? त्यामुळे केल्याशिवाय काहीच घडत नसते.

आपल्याला आव्हानांना सामोरे जाणे आवश्यक आहे. कर्म करणे आपल्या हातात असते. यशस्वी होऊ किंवा नाही. ते आपल्या इच्छाशक्तीवर अवलंबून असते.

न्यूटन व त्याचा मित्र एका प्रयोगावर काम करत होते. दोनशे वेळा प्रयोग करूनही तो यशस्वी होत नव्हता. मित्राने प्रयोग बंद करण्याबाबत न्यूटनला समजावले. पण न्यूटन प्रयोगासाठी उत्सुक होता. मित्राने शेवटी काढता पाय घेतला.

पाचशे वेळा प्रयोग केल्यानंतर तो यशस्वी झाला. त्यामुळे कर्मावर विश्वास ठेवा. कर्माचा किमान फायदा म्हणजे अनुभव. अनेकदा कर्म करण्याआधीच आपल्याला अशक्य आहे हे आपण मनाशी ठरवतो.

जोपर्यंत आपण ते करणार नाही. तोपर्यंत कसे समजणार? अनेकदा अशक्य या नावाखाली आपण आपले कर्म करणे टाळतो. कर्म हाच खरा धर्म आहे. थोडी हिम्मत कराल तर लक्षात येईल की, कर्म आपल्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते.

नियोजित काम करणे कर्मण्यवादाचे मूळ आहे. वाघाचे कर्म आहे शिकार करणे. आणि बकरीचे कर्म आहे की गवत खाणे. जर मुके प्राणी कर्मवाद पाळतात तर आपण तर माणसे आहोत.

प्रत्येक जीवाचे कर्म हे ठरलेले असतात. अध्यात्मिक वाटेल. परंतु हेच सत्य आहे. ज्यांनी खऱ्या अर्थाने डिजिटल विश्वाचा चेहरा बदलला ते स्टीव्ह जॉब यांना त्यांच्या शेवटच्या काळात दवाखान्यात ठेवण्यात आलेले.

श्वास घेतांना त्रास होतो म्हणून कृत्रिम ऑक्सिजनचा मास्क लावला. त्यांनी तो पहिला. व शेवटचे वाक्य उच्चारले ‘बॅड डिझाईन’. आपल्या नियोजित कामात ते सर्वच विसरून गेले. एका अर्थाने कर्मवाद त्यांनी जगला.

अडचणी कुठे नाहीत? मग कर्म का टाळावे. स्वामी विवेकानंद यांच्या मते. कोणताही एक विचार घ्या. आणि संपूर्ण आयुष्य त्यावर जगा. त्यामुळे आपल्याला ठरवून दिलेल्या कामात कुचराई नको. अनेक गोष्टी घडू शकतात. फक्त त्यावर काम केले पाहिजे.

सर्वात महत्वाचे म्हणजे कारण देणे आधी बंद करायला हवे. जे आहे जसे आहे ठरवलेली गोष्ट करणे हाच कर्मवाद आहे.

,

2 प्रतिसाद ते “कर्मवाद”

  1. खूपच छान भाऊ खरच खूप काही शिकण्या सारख आहे या ब्लॉग वरून असेच ब्लॉग आणखीन वाचण्यासाठी यावे

    धन्यवाद तुमच्या मुळे थोडी का असेना पण माहिती मिळाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.