कर वाचवण्याचे सोपे पर्याय


कर वाचवण्याचे अनेक पर्याय सध्याला उपलब्ध आहेत. कर वाचवणे पेक्षा ‘स्वतःची कमाई’ वाचवणे जास्त संयुक्तिक राहील. त्यातील काही सोपे पर्याय. ‘पीपीएफ अकाऊंट’ बद्दल कदाचित जाणत असाल. ‘पब्लिक प्रोव्हिडंट फंड’ कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेतून ‘पीपीएफ अकाऊंट’ उघडून सध्याच्या नियमानुसार प्रत्येक वर्षाला सत्तर हजारापर्यंत रक्कम करमुक्त केली जावू शकते. आणि नवीन नियमानुसार. जो येत्या आर्थिक वर्षानुसार त्याची मर्यादा एक लाखापर्यंत वाढवली गेलेली आहे.

अकाऊंट मधील रकमेवर जवळपास किमान आठ टक्के व्याजदर मिळतो. हा एक सोपा परंतु, कर वाचवण्याचा उपाय आहे. याची एकच अट जरा जाचक वाटते, की याचा लॉकिंग पिरेड तीन वर्षांचा आहे. थोडक्यात, सुरवातीची पहिली तीन वर्ष पैसे काढता येणार नाहीत. दुसरा सोपा पर्याय म्हणजे, घर भाडे पावती. जर भाड्याने राहत असाल तर त्याच्या पावत्यांच्या रकमेवर कर वाचवला जाऊ शकतो.

आता घर स्वतःच्या मालकीचे नसेल तरीही याचा फायदा घेतला जावू शकतो. म्हणजेच, आई वडील याच्या नावावर असलेले घर. कदाचित हा चुकीचा पर्याय वाटेल परंतु, कायद्यानुसारच मुलगा/मुलगी आई वडिलांच्या घरात भाडेतत्त्वावर राहू शकतात. भाडे पावती करून दाखवू शकल्यास कर निश्चितच वाचवला जावू शकतो. अजून एक सोपा पर्याय म्हणजे शैक्षणिक बचत. यात तुमच्यावर अवलंबून असलेले व्यक्ती. मुले, पत्नी यांच्या शिक्षणावर केलेल्या खर्चावर करत सुट मिळू शकते. कदाचित या सर्व पर्यायांबद्दल जाणून असाल तर उत्तमच! बाकी, इन्शोरन्स व अन्य पर्याय उपलब्ध आहेत. पण त्यात गुंतवणूक करण्याआधी एखाद्या जाणकाराचा सल्ला घेतलेले योग्य.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.