काय करावं???????


आज कंपनीत एक काम दिल होत. आजचीच डेडलाईन दिली होती. पण नाही झाल माझ्याकडून ते पूर्ण. सुरवातच बेकार झाली. मागील दोन आठवडे बेंचवर बसून होतो. आणि आता काम दिल आणि ते देखील वेळेत झाल नाही. त्यात ना तिचा विचार सारखा येतो. सोडा तो विषय नाही तरी आजकाल दुसर काही मी बोलत नाही म्हणाल. शनिवारी आमच्या कंपनीतील टीमची पार्टी होती. एकदम झक्कास झाली. आणि रविवारी मित्रांसोबत ‘अवतार’ चित्रपट बघून आलो. जर अनिमेशनची आवड असेल तर जरूर पहा. खुपच जबरदस्त अनिमेशन आहे त्यात. कथा म्हणाल तर मला फार काही खास अशी काही वाटली नाही. पण चित्रपटातील इफेक्ट्स छान आहेत. अरे, एक गोष्ट सांगायची राहूनच गेली. मागील शुक्रवारी माझे नव्या कंपनीतील मित्र आणि माझा ‘मराठी आणि मनसे’ यावरून वाद झाला. वादच म्हटला पाहिजे. त्यांना मी सांगितलेले मुद्दे पटले नाहीत. मला ते दोघे ‘सगळे भारतीय आहेत. कोणालाही कुठेही राहण्याचा आणि स्वत:ची भाषा जपण्याचा अधिकार आहे.’ ‘मराठी लोक काम करत नाहीत’. अस बरंच काही बोलत होते.

मी त्यांना एवढंच शेवटी सांगितलं की ‘मराठी आणि परप्रांतीय आहेत यात फरक असतो.’ नाही पटल त्यांना. उलट राज ठाकरे आणि मराठी भाषेवरून वाद घालणारे कसे चुकीचे ह्याचा पाढा वाचला. पार्टीत एका चेन्नई च्या हिरोने आमच्या तिघांसमोर ‘मराठी इज होपलेस’. ‘आय डोन्ट स्पिक हिंदी’. अस बोलला. हे अस ऐकल्यावर माझ्या मित्रांना राग तर येणारच होता. त्यात हे तिघेही ‘बियर’ प्रेमी. जास्त काही वादावादी झाली नाही. पण मग त्यांना फरक काय असतो ते पटले. आणखीन एक गोष्ट सांगायची राहूनच गेली. गुगल चे एक सोफ्टवेअर आहे. जे नेट नसतांना सुद्धा संगणकावर मराठीत वापरू शकते. वापरून बघा. तुम्ही कोणत्याही सोफ्टवेअर मध्ये मराठीत लिहू शकता. सोफ्टवेअरचे नाव आहे गुगल आयएमइ (गुगल इनपुट मेथड).

नुसतंच मराठी मराठी करून काय उपयोग. आणि मला तरी वाटत सरकार किंवा राजकीय नेत्यांना नाव ठेवून मराठी वाढणार नाही. आपण प्रत्येक जण राज ठाकरे आहोत. आपण आपल्यात मराठी वाढवा. म्हणजे तस तुम्ही माझ्याहीपेक्षा अधिक बुद्धिमान आहात. पण मला जे वाटले ते मी सांगितले. अरे या सगळ्या गप्पात मुख्य मुद्दा तर राहूनच गेला. काल ‘ती’ ची बहिण माझ्या घरी आली होती. असो, पण मला ना आजकाल ‘ती’ची बहिणेचे वागणे पटत नाही. मुळात कोणाचंच वागण विश्वास ठेवावा अस वाटत नाही. सगळे माझ्यापासून दूर राहण्याचा जाणून बुजून प्रयत्न करतात अस वाटत. अगदी स्पष्ट आणि सोप्या भाषेत बोलायचं ठरलं तर ‘एकटेपणा’ वाटतो. आत्ताच जुन्या कंपनीतील माझ्या मित्राला दोनदा फोन केला तर त्याने तो उचलला नाही. आज माझी मैत्रीण दिवसभर ऑफ लाईन होती. तीच ओर्कुट प्रोफाइल बघितलं तर तिला खुपच जास्त मित्र आहेत. आणि मी आजकाल ना मी कोणाशी चाट करायला त्याला पिंग केले की तो लवकर त्याची प्रतिक्रियाच देत नाही. आणि अनेकवेळा तर ते  ऑनलाईन रहातही नाही. मला खूप वाईट वाटते. जाऊ द्या. आता मीच कोणाशी चाटींगवर रहायचेच नाही अस ठरवलं आहे. पण खुपच वेगळ वेगळ वाटत. काय करावं तेच कळत नाही.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.