काळजीपेक्षा भीतीच जास्त


मागील दोन दिवसांपासून मला थोडी सर्दी आणि खोकला झाला होता. मला सहसा आजार होत नाहीत. पण यावेळी मात्र सर्दी झाली आणि त्यानंतर खोकला. आईच काही विचारू नका. मी काही म्हटलं नाही तरी मेडिकल मध्ये जाऊन व्हिक्स, दोन पांढऱ्या रंगाच्या गोळ्या आणल्या आणि घे म्हणाली. आता तिच्याशी काही वाद घालण्यात काही फायदा नव्हता. बर मी काल घेतो म्हणालो आणि सकाळी विसरलो. तर आईने ताबडतोप माझ्या वडिलांना फोन करून सांगितले. मग काय सकाळी सकाळी वडिलांचा फोन ओषधे घे म्हणून. त्यांना मी घेतो म्हटल्यावर त्यांनी फोन ठेवला. बर सकाळी कंपनीत आलो तर माझा सिनिअर आला नव्हता. चौकशी केल्यावर कळले की, त्याची मुलगी पलंगावरून खाली पडली. आणि आता हॉस्पिटल मध्ये आहे. पलंगावरून पडल्यावर हॉस्पिटलमध्ये? अस विचारल्यावर कळले की त्यानंतर तिने उलट्या करायला सुरवात केली म्हणून हा आपला डॉक्टरकडे घेवून गेला.

तर त्या डॉक्टरांनी तीला हॉस्पिटलमध्ये भरती करून तीच्या तपासण्या केल्या. मग सांगितले सर्व काही ठीक आहे. पण एक दिवसासाठी ‘अंडर ओबझर्वेशन’ ठेवावे लागेल. कारण की, ती लहान आहे. आता तीचे वय ३ वर्षे असेल. हे सगळ ऐकल्यावर मी काय कोणी देखील समजेल की त्याला डॉक्टरांनी फसवले. आता माझ्या आई वडिलांप्रमाणे माझ्या सिनिअरने देखील त्याच्या परीने काळजी घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याची काळजीचा गैरफायदा डॉक्टरांनी घेतला. बर हॉस्पिटलसुद्धा साधे सुधे नाही. पुण्यातील एक खूप महागडे आणि मोठे हॉस्पिटल. किती खिसा रिकामा झाला असेल देव जाणे. माझा लहान भाऊ उद्योगी. कुठल्या तरी पेरूच्या झाडावर चढला. पाय घसरून पडला. पडल्यामुळे पायाला सूज आली. झाल माझ्या काकाने त्याला दवाखान्यात नेले. त्याच्या पायाचा क्ष किरण तपासणी केली गेली. अजूनही काही तपासण्या झाल्या. मग रिपोर्ट आला. मग म्हणाले हाडाच्या स्पेशालीस्टला दाखवा. काका पण ना, गेला घेवून माझ्या लहान भावाला, आठवडाभर नियमित जायचा यायचा. आणि आठवड्यानंतर सांगितले की फ़्याक्चर नाही आहे. सूज उतरण्याच्या गोळ्या दिल्या. मग काय गेली दोन दिवसात सूज. ते म्हणतात ना शहाण्या माणसाने न्यायालयाची आणि दवाखान्याची पायरी चढू नये ते ह्याचसाठी.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.