काही तरी करावं


चला आज राजीनाम्याचे इमेल माझ्या बॉसला पाठवला. नवी कंपनी आणि आत्ताची कंपनी निवडताना थोडा गोंधळ झाला होता. पण ठीक आहे. पुढच्या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून नवीन कंपनीत रुजू होणार आहे. पण एक गोष्ट सारखी मनाला खटकत आहे. मागील तीन वर्षात, मी अनेक नवनवीन प्रकारच्या वेबसाईटवर काम केल आहे. अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. पण माझ्या एकूण अनुभवात एक देखील मराठी वेबसाईट नाही. मी नेहमीच स्वतःची आणि कामाची प्रगती कशी होईल याचा विचार केला आहे. आणि यात यशस्वी देखील झालो आहे. एक वर्षापूर्वी मला नेटवर मराठीत कस लिहायचं किंवा कस दाखवायचं ह्याची जाणून घ्यायची खूप इच्छा होती. आणि जवळपास चार महिन्यापासून मी माझा ब्लॉग मराठीतून लिहित आलो आहे. आपण जे बोलतो ते खर करून दाखवलं तरच आपल्या बोलण्याला काही तरी अर्थ राहतो.

नेटवर अनेक मराठी वेबसाईट आहे. पण एकतर, त्यांचे मराठी फोन्ट सगळीकडे दिसतच नाही. आणि काही वेबसाईटचे डिझाईन भंगार. बर मराठी गाणी म्हणा किंवा मराठी चित्रपटसाठी खास वेबसाईट नाही. नेहमी नेहमी आपण नुसतंच त्या शब्दांच्या कडबोल्यात आपण स्वत गुंतून पडायचं? आणि आपल्या बरोबर अजून शेकडो लोकांना गुंतवून टाकायचं. बर मला सांगा, हजार नोंदी लिहिल्या किंवा प्रत्येक गोष्टीवर आपण नुसते बडबड करून काय फायदा? राजकारण्यांना किंवा महाराष्ट्र शासनाचे झोपलेल्या लाखो कर्मचाऱ्यांना नुसते शब्दांचे मार देऊन काय फायदा? मुळात आपण काय करतो हाच खूप मोठा प्रश्न वाटतो आहे. आणि खर सांगायचं झाल तर त्यांना आपण नावं ठेवण आणि आपली चीड व्यक्त करून आपली पित्र गेली स्वर्गात अस मानून थोडीच काय होणार आहे? म्हणजे मला तरी अस वाटत की आपणही एखादी मराठी वेबसाईट बनवावी. असो, जर तुम्हाला मराठीत वेबसाईट बनवायची असेल तर ती संधी मला मिळाली तर मी स्वताला भाग्यवान समजेल. तयार करून द्यायचे काम मी फुकट करून देईल. मला अशी संधी मिळावी अशी खूप मनापासून इच्छा आहे. काही तरी करावं, नुसतंच बोलण होतं आहे. जर तुमच्या ओळखीचा किंवा तुम्हाला तुमची वेबसाईट मराठीत करून  हवी असेल तर कृपया मला अवश्य संधी द्या. मी मनापासून आणि माझ्या क्षमतेचा पूर्ण वापर करून काम करेल यात शंका नाही.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.