का सतावते?


का सतावते आहे ती? चार दिवसांपासून हेच चालू आहे. तसं काल तिने मला दोन मेल पाठवले होते. पण पिंग करून गुड मोर्निंग केल तर, रीप्ल्याच दिला नाही. मी मुर्खासारखा दिवसभर तिने अस का केल म्हणून विचार करीत बसलो. आणि दुपारचा उपास तर आता रोजचाच झाला आहे. यार, रात्री जेवणाची इच्छा होत नाही. आणि सकाळी भूक असून त्या मिल्क शेकवर राहावे लागते. ती त्या जुन्या कॅन्टीनमध्ये जेवते. ती मस्तपैकी घरून डबा आणते. आणि ते जुन्या कॅन्टीनमध्ये ‘जेवण’ पाहून भूकच मारून टाकावी लागते.

काय माहित, तिची सेना कस काय जेवते? नाहीतरी ती वानरे म्हणजे एका पोळीचे जीव आहेत. पण माझ तसं नाही ना! किती उपास तापास केल्यावर ही देवी प्रसन्न होणार? काल त्या काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये काय दिसत होती ती.. आणि आज एकदम पांढरा रंगाचा ड्रेस.. एकदम नटरंग मधील सोनाली.. देवाचे उपकार म्हणायचे ती आज साडी घालून आलेली नाही. तशी माझी इच्छा आहे तीला हिरव्या रंगाच्या साडीत पहायची. यार, मी काय बडबडतो आहे. आज ती इतकी छान हसली ना त्या कार्टून शेंड्याकडे पाहून! यार, राग आणि प्रेम दोन्ही एकाच वेळेस आले. काय यार, मी इतका डब्बा आहे का? तिने मागील दोन दिवसात एकदाही ढुंकून पहिले नाही माझ्याकडे. म्हणजे आहे पण, इतका सुद्धा नाही.

आज काय माहित दिवाळी म्हणून की कोणता ‘डे’ आहे. बर्याचशा मुली साडी आणि मुले कुर्ते घालून आलेले आहेत. असो, मला त्यांच्याबद्दल काहीच बोलायचे नाही. बस तिने माझ्याकडे एकदातरी ढुंकून पाहावे. किंवा आज पिंग तरी करावे. सारखे मनात तेच विचार येत आहेत. करेल ती अस? किती सतावणार? काल ती कॅन्टीनमध्ये देखील असेच. मला माहिती आहे की तिचे मित्र माझ्यापेक्षा दिसायला चांगले आहेत. पण मग! जाऊ द्या. काल ती एका मित्र बरोबर जाऊन एक ‘कीटकॅट’ घेऊन आली. मला नाही आवडल. म्हणजे त्या कार्टूनला ही म्हणाली असेल. आणि तो माकड लगेच उड्या मारायला तयार झाल असेल. काय करणार ती आहेच इतकी सुंदर. कधी कधी वाटत देवाला इतकी छान मुलागीची इच्छा का केली मी. आणि त्यानेही त्याहून छान का निर्माण केल तिला? आणि त्यात आज शुक्रवार. मला या दिवसाचा खूप राग येतो आहे. काय बोलू, खूपच लवकर येतो हा शुक्रवार. आणि त्यानंतर ते दोन काळे दिवस. एकदा तरी तिने माझ्याकडे पाहावे. बस इतकीच इच्छा आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.