का हा दुरावा?


कसं बोलावं? ती गेले दोन दिवसांपासून ऑफिसमध्ये आलेली नाही. बहुतेक सुट्टी घेऊन घरी गेली असावी. मला खूप आठवण येते आहे. दोन दिवसांपासून तिने पाठवलेले सगळे मेल, तिच्याबरोबर झालेली चॅटची दोन पारायणे झाली आहेत. आणि वाचतांना तीचा तो छानसा चेहरा आठवतो. तो दोन ऑगस्ट आठवतो. ज्या दिवशी मी तिच्याशी पहिल्यांदा बोललो तो दिवस. आणि तिचे तीन ऑगस्टचे ‘हाय’. आणि परवाचे ‘हाय डियर’.. अगदी भरून आल होत मन. दोन दिवसांपासून मी नॉर्मल असल्याचा खूप खूप प्रयत्न केला. पण आता खरंच कंट्रोल नाही होत.

आज मी ‘अप्सरा’पासून ‘डियर’पर्यंत सगळ् वाचून काढले. वाटलं होत, मन शांत होईल. पण आता अजूनच आठवण येत आहे. तिची प्रत्येक गोष्ट साखरेच्या पाकातील बुडून काढलेली सुरी. प्रत्येक सेकंद आता युगाप्रमाणे वाटत आहे. सगळीकडे तीच आहे अस वाटत. परवा कॅन्टीनमध्ये तिची मैत्रीण असतांना तीच असल्याचा भास झाला. काय करू? जी जी पांढऱ्या किंवा लाल रंगाचा ड्रेस घालून येते त्यावेळी तीच आहे अस वाटत. जेव्हा लक्षात आले त्यावेळी तीच्या मैत्रिणीला ‘ती का नाही?’ अस विचारावं वाटलेलं. पण स्वतःवर कंट्रोल केल. जेवतांना मुडच येत नाही. भूक असते, पण मूड येत नाही. काल तिची सिनिअर लाल रंगाचा ड्रेस घालून आलेली. आणि परवा रात्री हॉटेलात एक मुलगी देखील लाल रंगाचा ड्रेस घालून आलेली. त्यावेळेसही तीच असल्याचा भास झालेला. काय जादू केली आहे यार तिने?

फक्त तीच तीच आणि तीच. स्वप्नातही तीच. त्यातही मला असेच तडफडावे लागते. तीनचारच्या आत झोपेचा पत्ताच नाही. बसमध्ये येते. पण घरी आल्यावर रात्री तिची आठवण असते झोप येतंच नाही. तिला माझा विचार येत असेल का? झालं मी पुन्हा काय बडबडतो आहे. पण मी काय अपराध केला आहे? असा दुरावा का? देव अस का करतो यार? तिच्यावाचून काहीच चांगल वाटत नाही. माझा एक मित्र आहे. मला तिला प्रपोज कर अस म्हणून सारखा सांगतो आहे. काल माझ्या जुन्या कंपनीतील माझी मैत्रीण देखील हेच. एक तर तीचा नाद सोड किंवा बोलून मोकळा हो. अस बोलली.

तो माझा मित्र मला सांगत होता, मुली सुरवातीला ‘नाही’ बोलतात. मग तुम्ही आता म्हणा किंवा दोन महिन्यांनी. त्यांना तुम्ही प्रेम करता कळल्याशिवाय त्या विचार कसा करतील?. नंतर पुन्हा एकदा प्रपोज करायचे. मग ‘हो’ म्हणतात. त्याला विचारलं तू केल आहेस का आधी कधी प्रपोज. तर त्याच्या प्रेमाचे ‘तीन’ पार्ट सांगितले. पण मला नाही पटत त्याचे लॉजीक. मला म्हणत होता मुलींना या प्रपोजची सवय असते. त्यांना राग वगैरे काही येत नाही. मला माहिती आहे हे! या आधी देखील अनेक ‘हिर्यांनी’ अस प्रपोज केले असेल. पण मी नाही केल कुणाला याआधी. ती इतकी छान आहे. तिला पाहूनच हजार दोन हजार मुलांनी नक्कीच तसा प्रयत्न केला असेल. कदाचित तिला हे नवीन नसेल, पण मला त्या हजार दोन हजारातील एक व्हायचे नाही. माझ्या करिता ती खूप स्पेशल आहे. मी आजकाल रोज देवाच्या पाया पडतांना तीच हवी अस मागतो. मला नाही कळत आहे, हे चुकीचे की बरोबर. असो, आज मी दुपारी घरी चाललो आहे. दसरा आहे म्हणून. या रविवारी परीक्षा नाही आहे. बापरे! अजून हे तीन दिवस कसे जाणार? का येतो हा दुरावा?


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.