कोणता व्यवसाय करू?


व्यवसाय हा कोणत्याही गोष्टीचा होऊ शकतो. शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी शाळा हे शिकण्याचे माध्यम असेल. परंतु शाळेत विद्येच्या बदल्यात मिळणारे वेतन हे शिक्षकांसाठी व्यवसायरूपी साधन असते. चहाची टपरी ते हॉटेलपर्यंतच्या गोष्टी व्यवसायात मोडतात. तेच काय आजकाल फेसबुक, ट्विटर हे देखील व्यावसायिक साधने झाले आहे.

अनेकांसाठी चारचाकी गाडी हे स्वप्न असते. परंतु, व्यावसायिकांसाठी ते पैसे कमावण्याचे साधन असते. असच काहीसे दुसरी सदनिका देखील आहे. मुद्दा इतकाच की व्यवसाय हा कोणत्याही गोष्टीचा केला जाऊ शकतो. त्यामुळे व्यवसाय कोणता करू या प्रश्नाचे उत्तर जे काम करायला आवडते व ज्यात आपण निपुण आहोत त्या प्रत्येक गोष्टीचा व्यवसाय करता येऊ शकतो! मग प्रत्येकासाठी योग्य व्यवसाय वेगळा असू शकतो.

स्वतःवर विश्वास ठेवा. बाजाराची माहिती मिळावा. कच्चा माल कुठे मिळतो व कुठे विकले जाऊ शकते याचा अभ्यास करा. आणि बस व्यवसायात उडी घ्या. तुमची परीक्षा सुरु! पास झाला तर पैसे कमवाल. नाही कमावू शकले तर चुका आणि अनुभव मिळवाल. त्यामुळे फार चिंता करू नका! कोणीही जन्मतः व्यावसायिक नसतो. अपयश पैसे गमावते पण ज्ञानाचे भांडार वाढवते!


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.