कोरेगाव पार्क


आपण कोण आहोत? मुळात आपण आहोत का? काल जे घडल त्यावरून काय बोलाव तेच समजत नाही आहे. माझी यापूर्वीची कंपनी ज्या जर्मन बेकरीत घडला त्याच्या पुढच्या चौकात आहे. जा इमारतीत तो बॉम्ब फुटला, त्याच्या समोरच्या रस्त्याने मी अनेकदा गेलो आहे. खूप बेकार वाटत आहे. कोरेगावपार्क मधील माझ्या जुन्या कंपनीत मी दीडवर्ष होतो. जी लोक मारली गेली. जी जखमी झाली. ते आपले भाऊ होते. ज्या इमारतीत ती घटना घडली, म्हणजे ती जर्मन बेकारी पुण्यात खूप नावाजलेली आहे. आणि हेच कारण होत बॉम्ब स्फोट होण्याच. माझ्या मते ही घटना घडणार याचा पोलिसांना आणि आपल्या सरकारला पूर्ण माहिती होती. चार महिन्यापूर्वी तिथे पोलिसांनी एक चेकपोस्ट बनवले होते. आता तिथेच केले आणि आमचे पोलीस (‘पोलीस जवान’ शब्द आता पासून वापरणार नाही) पहारा देत होते. काय पहारा चालायचा हे मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेला आहे.

नॉर्थ मेन रोडवर (ओ हॉटेलच्या बाजूला) एक तंबू टाकला होता. आणि रस्त्यावर गतिरोधक ठेवलेले होते. असाच पहारा साउथ मेन रोडवर देखील केला होता. पण आमच्या महान पोलिसांना बहुतेक कोरेगाव पार्कात फक्त दोनच रस्ते आहेत अस वाटत असाव. चेकपोस्टवर फक्त एक महिना खडा पहारा होता. दुसऱ्या महिन्यापासून पोलिसांपैकी कोणी मोबाईलवर, तर कोणी तंबाखू चोळत खुर्चीत गप्पा मारत बसलेला. अनेकवेळा तर तिथे कोणीही पोलीस नसताना मी पाहिलेला आहे. त्यामुळे तिथे घडणार हे त्यांना नक्की माहिती होते. आपले सरकार हे जाणून होती. आज आपण कोणत्याच पक्षाबद्दल बोलणार नाही. तुम्हीही टाळा. कारण चूक कोणत्याच पक्षाची नसून ती तिथ झालेल्या पोलिसांच्या हलगर्जीपणाची आहे. काही वेळापूर्वी माझ्या मित्राशी माझ याच विषयावर बोलण झाल. फोन येण्याआधी मी नेहमीच्या पद्धतीने फक्त सरकार जबाबदार अस काही तरी बोलणार होतो. पण सरकार आहे का? हा प्रश्न स्वतः ला विचार. आता या प्रश्नाचं उत्तर घ्यायला राहुल गांधीची गरज नाही. न्याय व्यवस्थेला आपल्या इथे काही किंमत आहे का? आणि जरी कोणताही निर्णय त्या न्याय व्यवस्थेने दिला तर त्याचा काही परिणाम होतो का? ह्याची उत्तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे.

आता घरी येताना प्रत्येक चौकात चर्चा चालू आहे. आणि मुळात हेच सगळीकडे चालू आहे. आपण भारतीय नागरिक फक्त चर्चा करण्यातच पटाईत आहोत. यापलीकडे जाऊन आपण काही करू शकत नाही. दुसर्याला दोष देणे. नेहमीच्या पाकिस्तान विरोधी पुंग्या वाजवायच्या. आणि आपण आपापल्या घरात जाऊन संसार करायचा. आपल सरकारला काही लोकांबद्दल ना काही फिकीर आणि ना काही काळजी. न्यायालयाचे आदेश ते पाळतच नाहीत. राजकीय पक्ष मग तो कोणताही असो. बस त्यांना हवी मत आणि मतदान. पोलिसांचे संरक्षण किती चांगले असते. ते किती जबाबदार असतात. हे मी त्या कोरेगावपार्कात असलेल्या चेकपोस्टवर पहिले आहे. त्या पोलिसांनी कधी कोणाला हटकले, किंवा तपासणी केली. किंवा तशी कोणती सामग्री होती. यातली एकही गोष्ट मी कधी पहिली नाही आणि ना कधी ऐकली. आपण कोणाच्या भरवशावर रात्री निश्चिंतपणे झोपा काढत आहोत याचा विचार आता करावाच लागेल. जे मारले गेले त्यांच्या घरच्यांना किती दुख झाले असेल. आपल्या घरातील एकदा व्यक्ती बद्दल ‘तो गेला तर’ अस विचार करून बघा. कल्पना तरी सहन होते का? आपण एक क्षण पेक्षा अधिक हा विचारही मनात ठेऊ शकतो का? आणि काय अर्थ आहे त्या लाख रुपयांचा? पडलेली इमारत पुन्हा बांधणे शक्य आहे. पडलेला पूल, तुटलेले रस्ते आणि वाहने परत पहिल्या सारखे होऊ शकतात. पण गेलेला माणूस परत आणता येत नाही. आपण किती निर्दयी आहोत. अशा घटनांचा आणि गेलेल्या माणसांबद्दल आपण एक बातमी म्हणून दोन पाच मिनिट विचार करतो आणि नंतर सोडून देतो. आपण मुळात जाब विचारतच नाही. आपण आहोत याची प्रचीती कधी आपण दाखवतच नाही.

राजकारणी एक मेकांवर चिखलफेक करतात आणि आपण फक्त मनोरंजन म्हणून पाहतो. चर्चा करण्यात आणि टीव्ही पाहण्यात आपण जगात नंबर एक आहोत. आपण काहीच करू शकत नाही. आणि विचार करून गप्पाच्या पलीकडे आपण जाऊ ही शकत नाही. सरड्याची धाव कुंपणापर्यंत.आता बघा किती पाने आणि किती तास चर्चा घडेल. सगळ्या चर्चेच एकच तात्पर्य ‘पाकिस्तानने हल्ला केला’. अरे लाज वाटायला हव्या. आपल्या घरात घुसून ते आपल्या लोकांना मारत आहे. आणि आम्ही आहोत की ‘जैसे थे’. कधी सुधारताच नाही. कितीही हल्ले करा. काही वाटत नाही. सरकार ही तसेच आणि आम्हीही तसेच. तो कुत्रा हिजडा डुक्कर दोन.. अवलाद अशोक चव्हाण. त्याला मुख्यमंत्री म्हणायची देखील मला लाज वाट्त आहे. मला वरील वाक्यासाठी खरच क्षमा करा. माझ चुकल आहे. माझ्या आई वडिलांनी असे संस्कार माझ्यावर नाही केले आहे. पण.. लोक मरून देखील त्याला काहीच गम ना पस्तावा.

चूक सर्वस्वी पोलीस दलाची आहे. आणि हे त्या मुंबईत बसून किंवा दिल्लीत बसून कोण्या पदाधीकार्याचे मत नाही आहे. मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेला ‘पोलिसी पहारा’ आहे. कदाचित तुम्हाला माझ मत पटल नसेल. पण आपण कुठेच सुरक्षित नाही आहोत. सुरक्षित राहण्यासाठी आपण एक तर अमेरिकन किंवा इस्राईलचे नागरिक असायला हवे. ही वस्तुस्थिती आहे. किंवा आपण पाकिस्तानच्या बाजूने काही तरी चांगले बोलायला पाहिजे. तरच आपण सुरक्षित राहू शकतो. पुण्यात कुठेच काहीच सुरक्षा नाही आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.