क्षमा असावी


माझ्या त्या एका ओळीच्या इमेलमुळे आणि त्यामुळे पुढे आलेल्या प्रतिक्रियांमुळे अनेकांना त्रास झाला आहे. झालेला प्रकार खुपंच दुर्दैवी होता. सुरवात माझ्यामुळे झाली असल्याने याला संपूर्णपणे मीच जबाबदार आहे. तुम्हाला घडलेल्या त्रासाबद्दल मी तुमच्या सर्वांची हात जोडून क्षमा मागतो. यापुढे परत कधी हा प्रकार माझ्याकडून घडणार नाही याची मी काळजी घेईल. आपण सर्वांना झालेल्या त्रासाचा, मनस्तापाचा आणि वाया गेलेल्या वेळेचा कोणत्याही प्रकाराने भरून काढणे शक्य नाही हे मी जाणतो. यावर आलेले इमेल आणि त्यावर आलेल्या नोंदी, प्रतिक्रिया मी वाचल्या आहेत. अनेकांनी ‘मुर्ख’ वगैरे शब्द प्रयोग वापरले आहेत. अनेकांचे कामात आलेल्या व्यत्ययामुळे खूप त्रागा झाला आहे. अनेकांच्या कंपनीच्या इमेल आयडी असल्याने त्यांना कामात त्रास झाला.

मी व्यक्तिशः ओळखत नाही. तरी देखील आपण सर्वांच्या नोंदी, प्रतिक्रिया मी वाचतो. आणि ‘मराठी’ दिनाचा माझा मेल आणि नोंदींवर प्रतिक्रिया ह्याचा उद्येश कोणालाच त्रास देण्याचा नव्हता. परंतु त्यापुढे सुरु झालेलं प्रतिक्रियांचे इमेल आणि त्यावर सुरु झालेला ‘थांबवा’ चे इमेल यामुळे हा घोळ अधिकच वाढला. त्या रोज येणाऱ्या जाहिरातीच्या इमेल पेक्षाही अधिक दुखदायक होता. अजूनही बरेच इमेल येत आहेत.  सर्वांनी ‘थांबवा’ आणि त्यावर आपली मत मांडण्याचे इमेल नाही टाकले तर मी आपला कृतज्ञ राहिलं. आणि माझी चूक मला पूर्णपणे मान्य आहे. सगळ्यांना होणाऱ्या त्रासाची सुरवात माझ्या त्या एका ओळीच्या इमेलमुळे झाली आहे. आपण उदार मनाने त्यावर तुमचे मत प्रकट केल्याबद्दल धन्यवाद. आणि माझ्या त्या घडलेल्या चुकीमुळे तुम्हाला जो त्रास सहन करावा लागला. जो वैताग आणि मनस्ताप झाला आहे, त्याबद्दल मी तुमचे हात जोडून माफी मागतो.  ह्या मुर्ख आय.टी वाल्याच्या चुकीचा त्रास तुम्हा सगळ्यांना झाला याबद्दल क्षमस्व.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.