खर्चाच गणित


मागच्या दोन महिन्यापासून खर्च अगदी कळस गाठ तोय. ‘ कमाई चाराणे खर्च रुपया ‘ अशातली ही गत झाली आहे. त्यात आपल्या देशात मनमोहनचे राज्य. म्हणजे विचार करायला वावच नाही.

असो, कसा खर्च कमी करावा, अस ठरवल की खर्च अधिकच वाढतोय. नेहमीचा जो काही खर्च आहे त्यात दररोज काहीना काहीची भर पडत जाते आहे. आधी ह्याच वस्तूंवर मी खर्च केलाय पण एवढा काही होत नव्हता. आता का होतोय ह्याच काही शोध लागेना. त्यात ह्या मन्दिचे कारण सांगून कंपनीने अधिकच चांदी करून घेतली आहे. म्हणजे ती देखील अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. मुळात कशात आणि कोणात अपेक्षा ठेउच नये. नाहीतर उगाचच नंतर पश्यातपची वेळ येते. आणि काही कारण नसताना वर्तमान आणि भविष्य यात होणारी प्रगती यावर परिणाम होतो.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.