गणेश उत्सव आणि प्रदूषण


दरवर्षी गणेश उत्सवात वर्तमानपत्रात रकानेच्या रकाने या विषयावरून भर भरून लेख येतात. कोण कुठली पर्यावरणवादी नावाची जमात जणू काही गणपती येतो म्हणजे सगळ विश्वात जणू हाहाकार माजतो अस काहीस मत मांडतात. न्यूजच्यानल वाले कोणाला तरी पकडून आणतात. आणि तो मग जणू काही तरी वाईट घडत आहे, अस काहीस भासवतो. आजही तेच चालू होते रटाळ. काय कराव हे जणू त्यांनाच माहित आणि आम्ही जणू आत्ताच जन्माला आलो आहोत. हि गोष्ट त्या वेळची आहे ज्यावेळी मी नवीनच संगणकाचा कोर्ससाठी नगरला जात होतो. माझे काही मित्र वर्तमानपत्रात मोठ्या हुद्द्यावर असल्याने त्यांच्या आग्रहास्तव मी ‘पत्रकारिता’ नावाच्या एका सहा महिन्याच्या कोर्स ला सहभागी झालो.

आम्हाला शिकवणारे सर लोक लोकसत्ता, सकाळ अशा वर्तमान पत्रात मोठ्या हुद्द्यावर, काही समाज सेवक आणि काही क्राएम रीपोर्टार. त्यामुळे खर तर, त्यांच्या कडून आपण कोण आणि काय करू शकतो याची माहिती खूपच चांगल्या पद्धतीने समजली. पत्रकार कसा आणि कोण असतो. त्याने काय करायला हव आणि ते कशा पद्धतीने मांडायला हव, याची कशी सांगड घालायला हवी. या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला नीट शिकवल्या होत्या. ते नेहमी चालू विषयावर बोला, लिहा अस सांगायचे. कधी कधी सर्वांसमोर आपले मत मांडायला लावायचे. खर तर वकृत्व स्पर्धेत शाळेत असताना भाग घेण्याचा फायदा इथे झाला हे नक्की. त्यावेळी गणपतीच्या काळात त्यांनी ‘गणेश उत्सव आणि प्रदूषण’ या विषयावर आम्हा सगळ्यांना मते मांडायला सांगितली. प्रत्येकानी समोर जावून आपआपले मत मांडायचे.

सुरवात एका मुली पासून झाली. ती आली आणि म्हणाली कि, मला गणेश उत्सव खूप आवडतो पण मी कधीच गणपतीची मिरवणूक बघितली नाही. अस म्हटल्या म्हटल्या सगळेच हसू लागले. त्यावर सर म्हणाले कि असे अनेक लोक आहेत कि जे मिरवणुकीत गुलाल उधळणे किंवा चित्र विचित्र कृत्य करणे. यामुळे ते मिरवणूक बघायला येत नाहीत. त्यांचे मत बरोबर होते. आणि ते मला देखील पटले. दुसरा आला आणि त्याने गणेशा मंडळ मोठ मोठ्याने गाणी लावतात. त्यामुळे ध्वनी प्रदूषण होते. मुलांच्या परीक्षा आणि लोकांची झोप मोड कशी होते. याचे सविस्तर वर्णन केले. तिसर्याने तर गणपती उत्सवामुळे रस्त्यावर खड्डे पडतात. वाहतुकीची कोंडी होते. असे मुद्दे मांडले. पुढचा म्हटला कि वर्गणी वगैरे प्रकार बंद करायला हवे. त्याच बरोबर गणपती मंडळे कशी दादागिरी करतात. आणि पत्ते, जुगार खेळतात. याची माहिती दिली. अस एका मागून एक जण उठून गणेश उत्सव करणे कसा चुकीचा आहे. ह्याचाच वर्णन करत होता. एक जण म्हटला कि गणेश विसर्जनाच्या दिवशी ज्या मंडळांना परवानगी घेतलेली नाही त्यांना जेल मध्ये टाकल पाहिजे. एक जण म्हटला कि ‘एक गाव एक गणपती’ हि योजना राबवली पाहिजे. एक म्हटला कि या अशा गोष्टींमुळे दंगे होतात. मग या नंतर एक विश्व हिंदू परिषदेचा विचार मानणारा एक जण उभा राहिला. आणि त्याने सगळ्यांना धमकी वजा हिंदू सणांना नाव ठेवणे बंद करा. हे हिंदूंविरुद्ध षडयंत्र आहे. अस मत मांडलं.

विशेष गोष्ट म्हणजे एक मुस्लीम मुलगा म्हटला कि गणेश उत्सव खूप चांगला आहे. त्याचा हेतू आणि पद्धत खरच खूप छान आहे. त्यानंतर एक नाव बौद्ध मुलाने सुद्धा हा उत्सव का करायला हवा हे सांगितले. मी हे सगळ एकल्या नंतर मला सगळ्यांचे विचार पटले होते. पण ह्यांना माझा मुद्दा कसा पटवून द्यावा हाच विचार करत असताना, आमचे सर मला म्हणाले कि तुला नाही बोलायचे का?. मी सगळ्यांसमोर जावून उभा राहिलो. मग सुरवातीला मी काय बोलणार हे खर खर सांगितलं. त्याना म्हणालो कि मी एका मंडळाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे, मला जरी तुमचे विचार पटत असतील तरी देखील मी याचे समर्थन करणार नाही. त्यांना म्हटलं कि तुमच सगळ्यांच म्हणन बरोबर आहे कि गणेश उत्सवाने रस्त्यावर खड्डे पडतात, ध्वनी प्रदूषण होते, गुलालामुळे अनेकांना त्रास होतो, वर्गणीचा गैरवापर होतो. विना परवानगी मंडळे विसर्जन मिरवणुका काढतात. हे सगळ मान्य. पण याचा अर्थ असा नाही कि गणपती बसवणे वाईट किंवा मंडळे लोकांची पिळवणूक करतात. काही असतीलही. पण मला एक गोष्ट सांगा कि जर गणेश उत्सव करणे बंद केला तर काय रस्त्यावरील खड्डे पडणे बंद होईल?. ध्वनी प्रदूषण थांबेल? दंगे थांबतील? अस जर काही होणार असेल तर नक्कीच गणेश उत्सव बंद केला पाहिजे. पण जर होणार नसेल तर मात्र ह्याच्यामुळेच सगळ काही घडत अस म्हणू नका. उरला प्रश्न ध्वनी प्रदूषणाचा तर दहा दिवस तुम्हाला त्रास होतो आणि वर्षभर मशिदीवरील भोंगे चालू असतात. मग त्यावेळी का नाही काही त्रास होत? जर तुम्हाला ध्वनी प्रदूषण बंदच करायचे असेल तर हे दोनीही बंद करा. आणि अनेक मंडळे आता मिरवणुकीत गुलाल एवजी मुरमुरे किंवा फुले यांचा वापर करतात. त्यामुळे त्रासाचा काही प्रश्नच नाही.

काही जण म्हणाले कि विसर्जन मिरवणुकीची परवानगी न घेणाऱ्या मंडळांना जेल मध्ये टाका. आता परवानगी घ्यायला गेल कि पोलीस विचारतात कि तुमच मंडळ रजिस्टर आहे का? नसेल तर रजिस्टर करून घ्या. आता रजिस्ट्रेशन चा खर्च पाच हजार आहे. आता अनेक मंडळांची एवढी ऐपत नसते. काहींची वर्गणी देखील तेवढी नसते. मग काय त्यांनी मिरवणूक काढायचीच नाही? आणि उरला प्रश्न एक गाव एक गणपती चा तर ते ज्या गावाची लोकसंख्या १०००-१५०० आहे तिथे अस कारण शक्य आहे. इतर ठिकाणी नाही. कारण प्रत्येकाचीच इच्छा असते. आता हेच उदाहरण घ्या ना, आमची गल्ली १०-१५ घरांची देखील नाही. पण तिथे दोन मंडळे. एक मोठ्यांचे आणि दुसरे छोट्यांचे. आता तुम्ही त्यांना म्हटले एकानेच गणपती बसवायचा. जर तुम्ही मोठ्यांना बसावा म्हटला तर, लहान नाराज आणि जर लहांना बसावा म्हटला तर मोठे नाराज. आणि हि तर फ़क़्त आमच्या गल्ली पुरतीच गोष्ट आहे. गावाचा विचार केला तर तंट्या शिवाय काहीही हाती लागणार नाही. आणि दंग्यांना काही गणपतीच कारणीभूत आहे अस नाही. आणि गणपती बसवल्याने दंगे होतातच अस देखील नाही. शेवटी त्यांना म्हटलं कि इथ लोकशाही आहे. लोक त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांचे सन साजरे करतात. तुमच मत तुमच्या विचाराने बरोबर आहे आणि त्यांना त्यांच्या पद्धतीने. मला वाटल आता काय हे सगळे मिळून मला शिव्या घालतात कि काय. पण सुदैवाने माझ मत सगळ्यांना पटल. सर तर मला आमच्या येथील पोलीस अधिक्षाकानाशी या विषयावर बोल अस म्हटले. कारण त्यांनी एक गाव एक गणपतीचा ध्यासच घेतला होता.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.