गप्पांना विराम


आज मी माझी ऑर्कुट, फेसबुक, हायफाय, जी टाल्क, स्टायल एफ एम, लिंक्ड इन यातील खाती बंद केली. थोडक्यात, गप्पांना विराम दिला. काही दिवसांपासून अस करू का नको याचा विचार करत होता. आज करून टाकल. कंपनी बदलल्या पासून मित्रांचे खुपंच ‘खतरनाक’ अनुभव येत होते. म्हणजे सगळेच एकदम प्रोफेशनल्स सारखे वागत होते. आता आपल्यांना काय म्हणणार? सगळेच मराठी. आपलेच दात आणि आपलीच जीभ. आणि त्यामुळे या नवीन कंपनीत आल्यापासून तसल्या फंदात पडलो नाही. मी कोणाशीही बोलायला गेलो तर त्याचं प्रत्युतर येतंच नसायच. उलट काहींनी मला ब्लॉक केल. असो, अस काही घडेल याची कल्पना नव्हती. बर त्यांचा रिप्लाय का नाही आला म्हणून विचार करण्यात माझा अख्खा दिवस जायचा.

ते बाकीच्याशी खूप गप्पा मारतात. कालच माझ्या मैत्रिणीला फेसबुकवर असंच हाल हवाल विचारले. पण तिचेही काही प्रत्युतर नाही. तीला आधी देखील मी एकदा असंच जी टाल्कमध्ये बोलायला गेलो. त्यावेळी देखील हेच घडल. म्हणजे ती एकच नाही अनेक आहेत. मीच स्वतःहून त्यांना पिंग करतो. पण त्यांना उत्तर द्यायची इच्छा नसते की माझ्यामुळे त्रास होतो देव जाणे. बर जुन्या कंपनीत असतांना मी अस कोणतीच गोष्ट केली नव्हती की ज्याने त्यांनी असे करावे. बर असे एखाद्या वेळेस घडले असते तर मला काहीच नसते वाटले. पण तीन महिन्यांपासून हेच चालल आहे. खूप बेकार वाटत आहे. म्हणजे आपण कोणाशी गप्पा मारायला जाव आणि त्याने काहीही न बोलता सरळ आपल्या कानाखाली वाजवावी. मुळात या सगळ्या गोष्टींमुळे माझ्या कामावर परिणाम होऊ नये म्हणून मला हा ‘गप्पा’ विषय बंद करावं लागला.

या कंपनीत आल्यापासून माझ्या जुन्या कंपनीतील सगळ्यांचीच खूप आठवण येते. पण सगळे इतक्या लवकर विसरतील अस वाटलं नव्हत. आता एक साधा फॉर्म १६ मिळायला महिना लागेल अस सांगितलं गेल आहे. असो. आज मुळात काही गप्पा मारायचीच इच्छा नाही. काल माझ्या बहीणाबाईचा फोन आला होता. आणि मी सुद्धा या सगळ्या गोष्टींनी इतका वैतागलो होतो. तिची काहीही चूक नसतांना मी माझा राग तिच्यावर काढला. असो, बहिणाबाई ‘त’ वरून ताकभात ओळखणाऱ्या आहेत. आणि खूप प्रेमळ आहे. तिच्याशी गप्पा मारल्यावर खूप छान वाटले. कोणी तरी आहे असे वाटले. थोडा राग देखील शांत झाला. नवीन कंपनीत आल्यापासून दिवसभर काम करतो आणि रेडिओ ऐकतो. घरी आल्यावर संगणक. विचारच नको यायला. कारण विचार, आठवणी मला येतात. आणि जे काही दुख-आनंद होतो तो देखील मला होतो. त्यांना काहीच वाटत नाही. पण यापुढे अशी घडलेली चूक पुन्हा घडणार नाही. त्यांनी स्वतः आता संपर्क केला तर चांगलंच आहे. पण यापुढे कधीच मी त्यांच्याशी स्वतः कोणत्याही पध्दतीचा संबंध ठेवणार नाही. आणि आठवण देखील. असो, माझ्या गप्पांना आता विराम देतो. बाकी बोलूच.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.