गांधीगिरी


आता गांधीगिरी कशाला म्हणतात हे सांगायला हवं का? तुम्ही पण काय थट्टा करत आहात. अहो, जसे प्रत्येक पुणेकराला ‘दादागिरी’ आणि ‘भाईगीरी’ माहिती आहे. तसे प्रत्येक भारतीयाला गांधीगिरी म्हणजे काय हे माहिती आहे. बर, तुम्हाला लवासाची ‘पॉवरगिरी’ नक्की माहिती असेल? ते सुद्धा नाही. आता मात्र कमाल झाली. बर मुंबईतली ‘गोळीबार गिरी’ तरी माहिती असेल ना. ते सुद्धा नाही, बर ठीक आहे. मी सांगतो. ‘बंबई को किसने बचाया?? एनएसजी के लडकोने| एनएसजी के लडके कहा के?? उपी बेकार के|’. समजलं ना!! नाही? काय आता देवाशपथ! बर ठीक आहे. ‘मी देशाचा आणि देश माझा’. आता तरी लक्षात आल असेल ना. वाक्य अगदी बरोबर आहे. देश ह्या ‘राहू’चाच तर आहे. तर याला गांधीगिरी म्हणतात.

टीव्हीत तुम्ही तो एक पांढरा फटाका पहिला असेल, प्लास्टिकचे घमेले घेऊन जातांना. हो बरोबर! क ‘ग’लत क वर. ‘संघ आणि सिमीत फारसा फरक नाही’ याला गांधीगिरी म्हणतात. आता तशी अनेक लक्षण आहेत याची. तुम्ही पुलाचे नाव बदलून ‘जीव लिंक’ अस नाव जरी ठेवलं तरी गांधीगिरीच होते. किंवा क’साब’ला फाशी झाली. किंवा परमपूज्य ‘गुरूंना’ सर्वोच्च न्यायालयाने फाशी दिली. तर तिची अमंलबजावणी करतांना ‘जल्लाद नाही’ अस म्हटले तरी, किंवा ‘वो कतार में है’ अस म्हणण खरे ‘गांधीगिरी’ करण्यासारखे आहे. किंवा दोन पाचशे लोक मारल्यावर नक्षलवादी लांडग्यांना ‘चर्चा’ करायला बोलावयाचे. नाहीतर पाकशी ‘कमरेच्या’वरच्या स्तराची चर्चा. मुंबईवर हल्ला झाल्यावर ‘आम्ही प्रतिहल्ला वगैरे काही करणार नाही’. यालाच गांधीगिरी म्हणतात.

किंवा चिंचवडमध्ये येऊन ‘मोनोरेल’ची स्वप्न दाखवायची. पण रस्त्याचे खड्यांचे आणि कधीच वेळेवर न येणाऱ्या लोकल, पीएमपीएमएल बद्दल काहीच बोलायचे नाही. पण उदाहरण जपानची लोकलचे. किंवा दादर स्टेशनवर दोन पाच रुपयाचे तिकिटात अख्खी लोकलभर कमांडो ‘फ्रेंड’ घेऊन फिरायचे. शिरते आहे ना?? कशाला म्हणतात ‘गांधीगिरी’ ते! देश कुणाचा या प्रश्नाचे खरे उत्तर ‘राहू’चा अस आहे. आवाज सुद्धा त्याचाच. आणि त्याचीच ‘गांधीगिरी’ चालणार. बाकी काय नाय. तो शिरणार एखादया झोपडीत. एकाद्या शेंबड्याला उचलणार. दोन चार पापे घेणार. आणि मागून आलेल्या शेपट्या फोटो काढून त्या शेंबड्याला ‘आता तुम्हाला कसं वाटत आहे?’ अस विचारणार. आणि मग ते शेंबड शेम शेम करीत तिथून पळून जाणार.

तो ओरिसात आदिवासी पोरांसोबत दोन चार पावल बिना दाढीचे चालणार. आणि त्याच्या शेपट्या ते सुद्धा ‘कवर’ करणार. हा ‘झेड’ सिक्युरिटीतून सर्वांना ‘दहशतवाद विरुद्ध निर्णायक लढाईत उतरा’ अशी आवाहने करणार. कळलं असेल तुम्हाला बहुतेक गांधीगिरी कशाला म्हणतात ते. ‘तरुणांनी राजकारणात यावे’ आणि येवून ‘गांधी’च्या घरी ‘जी मॅडम’ करावे. आणि ‘कडप्पा’ संस्कृती जपावी. आता या देशाचे नाव बदलून ‘गांधीया’ किंवा ‘गांधीस्तान’ केले की गांधीगिरी सर्वार्थाने पूर्ण होईल. तर मग कधी करता आहात सुरवात गांधीगीरीला? फार काही नाही. दोनचारदा त्याच्या चप्पला उचलाव्या लागतील. बस! आणि त्याच्या येण्यातच/ त्याच्या हसण्यातच देशाचा विकास झाला अस मानायचं. शेवटी ‘ऑल इझ वेल’ करायचे. आणि तो आला की ‘तोहफा’ कुबुलीसाठी तयार ठेवायचा. कोणी एका गालात मारली की, तोहफा समोर करायचा. यालाच गांधीगिरी म्हणतात.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.