गाडी चालली


कालचा दिवस, काय बोलू आणि काय नाही अस झाले आहे. काल ‘बोललो’ म्हणण्या इतके बोललो. सकाळी कॅन्टीनमध्ये मला ती दिसली. पण बोलण्याची हिम्मतच होईना. दुपारपर्यंत असेच. शेवटी कंपनीतून निघण्याची वेळ आली. माझे झालेल्या कामाचा इमेल मी माझ्या सहकारीला केला. आणि थोड्या वेळाने मेल मिळाला का म्हणून त्या सहकारीकडे गेलो. तर ती, त्यावर चर्चा करीत बसली. शेवटी तिला माझी पाचची बस आहे अस म्हणून निघालो. जातांना ‘अप्सरा’ डेस्कपासून गेलो. तर ती होती डेस्कवर. माझ्या डेस्कवर जाऊन तो संगणक झटपट बंद केला. आणि पुन्हा व्हायचं तेच! हिम्मतच होईना. तीच्या डेस्कजवळ जायची. पण मग वेळच नव्हता. चार वाजून पन्नास मिनिटे झालेली. तसाच निघालो. आणि तीच्या डेस्क जवळ जाऊन तिला ‘बाय’ म्हटलं.

तिला कळलचं नाही. ती माझ्याकडे पाहून ‘हाय’ म्हटली. मग तिला पुन्हा मी ‘बाय’ म्हटलं. मग तिने हिंदीत ‘निघाले का?’ अस विचारले. एक तर ती मला अरे तुरे का करीत नाही, आणि त्यात एका मराठीशी एक मराठी हिंदीत. असो, पण नेहमीप्रमाणे मराठीत उत्तरे चालू ठेवली. मी ‘हो’ म्हटल्यावर. पुन्हा तिने मग मराठीत ‘घरी?’. मी पुन्हा ‘हो’. तिने कितीची बस आहे अस विचारल्यावर मी पाचची अस म्हटले. आणि तिने घड्याळात पहिले तर चार त्रेपन्न झालेले. मग ती म्हणाली ‘पुण्यातीलच का?’. मी पुन्हा ‘हो’. ती ‘अच्छा’. मग मी च सुरवात केली ‘तस मी नगराचा’. ती म्हणाली ‘नगर कुठे आले?’ आता ती गोव्याची आहे. हे मला माहिती आहे. पण तरीही तिला मी ‘तू महाराष्ट्रातील आहे ना?’. मग ती ‘नाही, गोव्याची’. अच्छा म्हणून तिला ‘पुण्यापासून नगर १२० किमी आहे’ अस म्हटले.

मग ती म्हणाली ‘म्हणजे जवळ आहे’. मी ‘हो’. मग ती म्हणाली ‘पुण्यात कुठे?’ मग मी ‘चिंचवड’. तिला मग तिचे राहण्याचे ठिकाणही विचारले. मग तिने मला ‘कसे येता? बसने की बाईकवर?’ मी ‘बस’. मग तिला विचारल्यावर ती देखी बसने येती असे कळले. खर तर ती बोलायला खूप उत्साही होती. पण मग माझी बस चुकली असती. बस चुकणे फार काही मोठे झाले नसते, पण आता मनावर ब्रेक नसता लावला तर सोमवारचे गप्पा सुरु करायला विषय नसता मिळाला म्हणून. मग तिला पुन्हा ‘बाय’ म्हणून तिथून सटकलो. खर तर आज आमच्या गप्पात ती एकदाही हसली नाही. जातांना देखील नाही. तिचे ते गोड हास्यासाठी उभा होतो. उभा कसला नुसता इकडे तिकडे डुलत होतो. मला ना, आता स्पष्ट आणि व्यवस्थित बोलण्याची सवय करावी लागेल. नाहीतर.. नकोच तो विषय.

यार, ती मुलगी असून माझ्याशी डायरेक्ट कुठे राहतो वगैरे विचारात होती. आणि मी भित्रा भागू बाई! असो, आज थोडी भीती कमी झाली. बस आता कधी येणार सोमवार अस झालं आहे. अरे हो, मी एक्स्टर्नल बीसीए ला आय सी एफ ए आय मधून २००६ साली एडमिशन घेतलेली होती. पण मग नोकरीच्या शोधत, नंतर नोकरी मिळाल्यावर वेळच मिळाला नाही. सगळ झरकन दिवस गेले. आणि मीही किती मोठा अभ्यासू होतो, ही देखील एक गोष्ट आहे. पण तिला उद्या ह्या विषयावरून दुख: नको व्हायला. मला फक्त ती हवी. पण आता करेल. आता ती ठेवलेली पुस्तकांचे खोके उघडतो आणि बघतो. अरे हो, माझ्या मित्राने अप्सराने त्याला पाठवलेला मेल काल पाठवला. खुपंच छान वाटले. आता कधी तो सोमवार येतो अस झालं आहे. ती इतकी गोड आहे ना! एका मिनिटासाठी बस सोडावी असं विचार मनात येत होता. पण निघालो. गाडी चालली म्हणायची. आता चूक की बरोबर केले काही कळत नाही आहे. पण सोमवार कधी येणार??


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.