गुरु पोर्णिमा


परवाच्या ताज्या बातम्या, ‘गुरु’पोर्णिमा धुमधडाक्यात साजरी झाली. आपल्या आजींनी आणि बडी बेगमने कारागृहात नाही तीर्थस्थळात जावून गुरूंचे दर्शन घेतले. गुरूंनी देखील मोठ्या मनाने आशीर्वाद दिला अस ऐकण्यात आले. आणि बेगम बरोबर मनमोहन खान होताच! गुरूंनी या सर्वांना त्यांची गुरुवाणीने या शिष्यांना मंत्रमुग्ध केले. पुढच्या वर्षी सगळे शिष्य मिळून गुरूला ‘देशाचे नागरिकत्वाची’ भेट देणार आहेत अस ऐकायला मिळालं आहे.

इकडे मुंबईत शोकराव वहाण सपत्नीक कसाब गुरूंच्या भेटीला होतेच. गुरुवर्य कसाब महाराजांनी त्यांच्या भक्तांना शुद्ध मराठीत उपदेश केला म्हणे. इकडे भानामतीला महात्मा पवारजी दर्शनाला त्यांची तीन-चार हजार माकडे होतीच. महात्माजींनी देखील आपल्या गुरुवाणीत डोळ्यावर, कानावर आणि तोंडावर हात धरायला सांगितला, पण दुसर्याच्या. म्हणजे आपले ‘समाजकार्य’ कोणाला कळत नाहीत. तसा आदर्श घरातीलच एका माकडाने घेतल्याचे ताजे उदाहरण त्यांनी आवर्जून सांगितले. तिकडे ममता दिदींनी सर्वांना आशीर्वाद देतांना ‘केमोन अच्चो?’, ‘की कोर्बे?’ अशी शिष्यांची विचारपूस केली.

लाल लांडग्यांनी धर्माची अफू गोळी खाल्ली नसल्याने गुरुपोर्णिमा साजरी केली नाही. बिहारात लालु महाराजांनी शिष्यांना आपली बिहारमोळी भाषेत लाठीवाणी दिली. तसे शिष्यांनी विधानसभेत पराक्रम गाजवून आधीच गुरुदक्षिणा दिलेली आहे. उत्तरप्रदेशमध्ये सर्व जनतेनेच गुरुपोर्णीमेला चौकाचौकात मायावतीदेवींचे दर्शन घेतले. तसे नेहमीच देवी आपल्या जनतेला गुरुवाणी देतंच असतात. मागील काही काळापूर्वीच समाजवादी पक्षाला त्यांनी गुरुवाणी दिली होती. तिकडे दिल्लीतील बिल्लीने जामा मस्जीदित जावून आपल्या गुरुचे दर्शन घेतले. त्यांनीही ‘गुरु’बचाव वाणी दिल्याचे आमच्या विशेष प्रतिनिधीने कळवले आहे.

इकडे अंधारात ‘चंदा’बाबू बबडूने आपल्या शिष्यांना बाभळीवाणी दिली. आणि खाली येडाअप्पाने कानडी अण्णांना कानडीत ‘बेळगाववाणी’ नाही नाही ‘बेळगावीवाणी’ दिली. आणि शिष्यगण पन्नास – साठवर्षापासून सीमा वासीयांवर अत्याचाराची दक्षिणा तर देतंच असतात. तिकडे लंकेत टीम अंडीयाने आपली दक्षिणा दिली. पण चुकून गुरूला देण्याऐवजी मुरलीला दिली. हिलरीने कोरियात तर ओssबामांनी अमेरिकेत आपल्या शिष्यांना गुरुवाणी दिली. बाकी चेंडूलाकूड मध्ये सर्व नव्या जुन्या अभिनेते/अभिनेत्यांनी बिग बी च्या जलसावर गुरुवाणीची तहान भागली. उरलेल्या थ्री इडीयट उर्फ खान आपआपल्या घरीच होते. आणि शेवटची आणि मुख्य बातमी मातोश्रीवर यावेळी सैनिकांनी सम्राटाचे आशीर्वाद मिळाले नाहीत. राजगडावर देखील कार्यक्रम पार पडला.

परवाच्या आपल्या ताज्या बातम्या संपल्या. कुठेही जाऊ नका! लवकरच येत आहे पुढचा कार्यक्रम.. बिझी मराठी… दोन चार पाऊल पुढे..


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.