गोल


गेले चार दिवसांपासून मी शाळेत जात आहे. म्हणजे चित्रकलेच्या क्लासला. जानेवारी महिन्यात मी फी भरलेली. पण मुहूर्त या महिन्यात लागला. माणसाच्या चेहऱ्याचे चित्र काढतांना लंबगोल आणि गोल हे बेसिक आहे. त्यावरच पूर्ण चेहरा अवलंबून असतो. पण, मी काढलेले लंबगोल जरा जास्तच ‘लंब’ होतो. अंडाकृती होतो. तर कधी ‘वर्तुळ’. काल एक चेहरा काढला. आता चेहऱ्याचे, डोळ्याचे, ओठांचे आणि कानाचे माप समजलेलं. चित्र काढल्यावर मात्र, आदिमानवाचा चेहरा तयार झाला. त्यानंतर काढलेला ‘गोलगप्पु’ झाला. यार, मी व्यंगचित्रकार होतो की काय याची शंका यायला लागली आहे. चित्रात आपोआप व्यंग निर्माण होते.

मनमोहन सिंगचे चित्र काढतांना पगडी जाम मोठी झाली. आणि प्रणव’दा’चा चष्मा. त्यानंतर एक चेहरा काढला तर नाक खूप मोठे झाले. बाकी शेडींग करतांना फार काही अडचण वाटत नाही. माझे पुण्य म्हणायचे माझी चित्र पाहून, मला चित्रकला शिकवणारी शिक्षिका हसत नाही. एकूणच आजकाल माझा दिनमान चित्रमय झाल आहे. एकतर माझ ‘डिझायनर’ म्हणून ही घुसखोरी आहे. मी वेब डिझायनर म्हणून चार वर्ष झाली. आता घुसखोर म्हणून राहायचे नाही अस ठरवलं आहे. त्यासाठी हा सगळा उद्योग. पण हा काय पुढे जाऊ देईना. गोल त्या शून्या प्रमाणे असायला हवा. माझा गोल म्हणजे वर्तुळ नाहीतर अंडे. आज पुन्हा सराव करीत आहे. असो, बाकी बोलूच.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.