ग्रामगीता :
ज्यासि तुझें दर्शन घडलें ।
त्यास कैंचे परके राहिले? ।
सर्व विश्वचि झालें आपुलें ।
दिव्यपणीं ॥११॥
– संत तुकडोजी महाराज
अर्थ: ज्याला तुझे दर्शन झाले त्याच्यासाठी कोणी अनोळखी आणि अज्ञात असू शकते? संपूर्ण विश्वाची आपले असे जिवंतपणी वाटू लागते!