गुरूशिष्य एकाच स्थळीचे – अध्याय पहिला ६


गुरूशिष्य एकाच स्थळीचे ।
भिन्न नाहीत पाहतां मुळींचे ।
सुखसंवाद चालती भिन्नतत्वाचे ।
रंग रंगणी आणावया ॥६॥
– संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)

अर्थ: गुरु आणि शिष्य पहायला गेला तर वेगळा कधीच नसतो. ते एकरूप असतात त्यांचे कार्य एकच असते विश्वकल्याणाचे. असा ब्रह्मस्वरूप गुरु ज्यांना मिळाला आहे. त्यांचा सुख संवादच होत असतो.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.