हें जयाचिया अनुभवा आलें ।
त्याचे जन्ममरणदुःख संपले ।
आत्मस्वरूप मूळचें भलें ।
ओळखलें म्हणोनिया ॥७॥
– संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)
अर्थ: महाराज म्हणतात हे ज्याच्या ध्यानात आले अनुभवास आले. त्याचे जन्म दुःख व मरण दुःखाचा अंत होऊन. त्याने आत्मस्वरूप जाणले आहे.