घराणेशाही


‘नारायण! नारायण!’ करीत नारदमुनी भाषणाला उभे राहिले. आराध्य विष्णूला वंदन करून बोलायला सुरवात केली. माझ्या विठ्ठलाने ‘घराणेशाही’ सुरु केली आहे. दहा एक वर्षापूर्वी उद्धवा उद्धवा असा धावा केला. म्हणून मला स्वर्गलोक सोडून नरकात यावे लागले. इथे ‘नारायण’ ऐवजी आता मला ‘गांधारी’ म्हणावे लागते आहे. आणि तिकडे माझ्याप्रमाणेच युवराजला देखील ते सोडून पृथ्वीलोकवर यावे लागले. हे स्वर्गात घडले. नरकात तर हेच चालते. महात्मा गंधर्वांनी सुरु केलेली परंपरा अजूनही चालू आहे. आता नवा राहुल गंधर्व.

आता नरकाला दोष देण्यात काय अर्थ? मी सुद्धा माझ्या ‘नितेशमुनी’ला आणून तीच परंपरा वाढवण्याची आणि त्याचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी कणकवलीत आणि सिंधुदुर्गात ‘ध्यान’ मग्न असतो. पण आता विठ्ठलाला नरकातच घराणेशाही चालते अस म्हणण्याचा काही एक अधिकार नाही. आता माझी सध्याची ‘गांधारी’ कशीही राहिली, वागली तरी तिला काय म्हणायचे नाय! कारण तीच तर माझ्या जीवनाची लक्ष्मी आहे. महाराष्ट्राचा बालक ‘सरददेव’ने पुण्यात लवासाशाही आणि देशात धान्य ‘सडवणे’शाही सुरु केली आहे. तशी मी नवीन ‘गोळीबार’शाही सुरु केली आहे. यावर मला मराठीतले एक सुंदर काव्य सांगावेसे वाटते आहे. ‘चोर आम्ही सरकार! आम्हाला काय कोणाची भीती?’.

नारायण नारायण!!! अरे चुकल गांधारी गांधारी. जुनी सवय मोडायला थोडा वेळ लागेल. तसे आता तुम्ही सर्वजण पृथ्वीलोकावर असलेल्या लोकांना कळून चुकलेच असेल. आता तरी लोकांनी समजून घ्यावे की स्वर्ग आता स्वर्ग राहिला नाही. तिथेही घराणेशाही चालू झाली आहे. आता ‘आदित्याय नमः’ करताय, उद्या ‘गोविंदाय नमः’ करायला लावतील. युवराज तर ‘तोडफोड’शाही वर विश्वास ठेवणारा माणूस आहे. त्यामुळे आता तुम्हा सर्वांना एकच तारणारा पक्ष आहे. तो म्हणजे आमचा राष्ट्रीय नरक पक्ष. तर मग जोरात बोला ‘अंधेरा कायम रहे’.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.