घरातील अतिरेकी


आज सुटी असल्याने घराची साफसफाई केली. मागच्या आठवडा भरात मुंग्यांनी नुसता उच्छाद मांडून ठेवला होता. कुठलाही कोपरा बघा मातीच माती. आणि बाथरूम मध्ये तर रात्री झुरळांचे राज्य. तरी बर उंदीर नावाच्या दहशद्वाद्याला आमच घर अजून माहिती नाही. नाही तर काय झाले असते देव जाणे. आज संध्याकाळी घरभर भिंतीच्या बाजूने ती मिळते ना लक्षमणरेषा ती आणून आखून ठेवली. तासाभरानी बघतो तर अनेक मुंग्या मेलेल्या. आणि पाच एक झुरळ. चला हा आठवडा तरी चिंता कमी होईल. घर पुसून काढण्याचा प्लान आखला होता. पण बाथरूम आणि किचन मधेच बराच वेळ गेल्याने, शेवटी फारशी पुसून काढण्याचा प्लान रद्द करावा लागला.

हे जे मुंग्या, झुरळ, कोळी, चिलटे, माश्या आणि उंदीर अतिरेकी आहेत ना. यांना घरात कोणती वस्तू कुठे ठेवली आहे हे कसे कळते हेच कळत नाही. असो पण आज फारच वाटत आहे. ह्या मुंग्यावर लक्षमण रेषेचा खूपच चांगला उपयोग झाला. सद्याला आई इथे नसल्याने कपडे धुण्यापासून ते भांडी घासण्याची सर्व कामे माझ्यावरच आहेत. तरी बर घरी जेवण करत नाही. नाही तरी मला कुठे काय बनवता येत? आई गावी गेल्या पासून ह्या मुंग्यांनी जिहादच पुकारला होता. कुठून एवढ्या मोठ्या संख्येने आल्या कोणास ठाऊक. बेसिन खाली माती, सिलेंडर च्या मागे माती, डब्यांच्या मागे माती. जिकडे तिकडे मातीच माती. आणि त्यात घरात पांढर्या रंगाच्या टाइल्स. मग काय विचारता. कंपनीतून घरी आलो कि कितीही झाडा. पण स्वच्छता राहातच नव्हती. आज बाकी छान काम झाले. कोळ्यांना तर मी थाराच देत नाही. त्यामुळे तरी घर बरे वाटते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.