घासदारांस पत्र


अप्रिय घासदार यांस,
मतदारांचा डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत दंडवत.

पत्रास कारण की, कालचा आपला अतुलनीय पराक्रम दूरदर्शनवर पाहून डोळ्याचे पारणे फिटले. उगाचंच, आमच्या देशात एकी नाही अस म्हटले जाते. आता आम्ही नाही म्हणू शकलो तरी तुम्ही ‘हम सब एकच है’ हे म्हणू शकता. जगाच्या कुठल्याही देशात, घासदार आपला घास वाढवा म्हणून इतकी मोठी एकी किंवा साधी मागणीही केलेली नव्हती. पण तुम्ही तो रचून आपल्या देशाचे नव्हे तर सर्व घासादारांची नावे गिनीज बुकच्या नव्या बुकात नक्कीच जातील. अजून काय पाहिजे देशाला? तुम्ही घडवलेला इतिहास खरंच अतुलनीय आहे.

आमचे भाग्य तुम्ही आमचे सर्व घासदार बनलात. तिकडे ते योगी बाबा नेहमी आम्हाला हेच तर सांगत होते की तुम्ही सर्व घासदार एकच आहात. पण आम्ही उगाचंच हा भाजीपाल्यावाला, ती सेवसेना, ते हंग्रेस, आणि हे सत्तावादी. पण तुम्ही नेहमी, विशेषत: आमच्या सीमाताईबद्दल कधी काही नाही बोलला. ना अस काल सारखं! बरोबर आहे ना मुंडा? पंचवीस कारखाने कमी आहेत का घास पुरवायला? तुम्हाला काय बोलून फायदा म्हणा, तिकडे सत्तेतील घासदार देखील तसेच. शरद लवासाकारांना देखील डोंगरे फोडून कुठे घास पुरतो आहे? चला पण एक झालं. आधी तुम्ही सर्वांनी मिळून जातगणना केली.

हे अगदी मस्त आहे. महिनाभर आधी पेपरात चर्चा, मिडियावर वगैरे विचार मंथन घडवून आणायचे. म्हणजे मतदारला फार मोठा धक्का बसायला नको. आणि मग हवे तसे करून घ्यायचे. त्याआधी ‘बंद’ करा म्हटला. आम्ही केला. श्रेयाचे श्रीखंड तुम्ही खाल्ले. मग रोज सामानात संजू उतचे विचार पाठ करायचे. आणि तिकडे संजू उत घासासाठी उतू जातोय. काय म्हणतात ते, तुसी ग्रेट हो? आमचा इन्कमटॅक्सचा पैसा तुमच्या घासासाठी कुबूल करो. कारण आम्हांला विमान प्रवास, परदेशी दौरा, रेल्वे प्रवास, पाच कोटींचा निधी मिळतो. आणि वरतून झेड सिक्युरिटी. तुम्हा घासादारांना बसचे धक्के. तुम्ही नेहमीच इन्कमटॅक्स भरता. आम्ही चुकवतो. तुमच्या सारखे घासदार, असल्यामुळेच देशाचे प्रश्न प्रश्न राहताच नाहीत. समस्या बनून जातात. आणि एक गोष्टीचे आश्चर्य वाटते, म्हणजे चमत्कारच म्हणायचा. की कुठल्याही विषयावर/विषावर चर्चा करायला म्हणे तीन महिने आधी अर्ज करावं लागतो. आणि काल अचानक तुम्हाला पाकिस्तान प्रश्न, दहशदवाद, नक्षलवाद, महगाई पेक्षाही मोठा घासाचा विषय आहे अस वाटल. अजून बऱ्याच गोष्टी आहे. पण तुम्हा घासादारांना वेळ कुठे असतो म्हणून वाढवत नाही. कशाला नाहीतरी या पत्राचा तुमच्या डुकराच्या कातडीला काय फरक? बलामा..डी पाहून नाही वाटत तुमच्यात काही सुधारणा होईल ते!

मनातले पत्रात मांडले. पण यापुढे तुमच्या मनातले न कळविताच कळले. पुढच्या वेळी आम्ही पत्र टाकण्याऐवजी तुमच्या घासदार मित्राच्या पारड्यात मत टाकू. बाकी क्षेम. आपला लोभ नाहीच. पण असावा अस लिहितात. म्हणून लोभ असावा.

पुन्हा भेट झाली नाही तर बरे होईल. आता यापुढे त्या सामानाला बंद करीत आहोत. सेवसेनाच्या सर्व घासादारांना आम्ही आमची मते देणार नाही. बाळासाहेबांची माफी मागून पत्राची पंत्रावली उचलतो. तुम्ही घास खा. आणि ते ही नाही पुरले तर देश विकून खा.

आपला
मतदार..


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.